---Advertisement---

हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याला या दिग्गज क्रिकेटपटूंकडून सलाम

On: मंगळवार, फेब्रुवारी 26, 2019 5:37 PM
---Advertisement---

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत आज(26 फेब्रुवारी) भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये लष्करी कारवाई केली आहे.

भारताच्या 10 मिराज विमानांमधून जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर 1 हजार किलोचे बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.

भारतीय वायू सेनेच्या या कारवाईमुळे देशभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून आनंद साजरा केला जात आहे. तसेच अनेकांनी भारतीय वायू सेनेचे कौतुक सोशल मीडियातून व्यक्त केले आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक अशा अनेक खेळाडूंनी भारतीय वायू सेनेचे कौतुक करणारे ट्विट आज केले आहेत.

सचिनने ट्विट केले आहे की ‘आमच्या चांगुलपणाला आमची कमजोरी समजू नका. या कारवाईबद्दल मी भारतीय वायू सेनेला सलाम करतो. जय हिंद.’

तसेच सेहवागने ट्विट केले आहे की ‘बाॅयज प्लेअड वेल, सुधर जाओ वरना सुधार देंगे. एअर स्ट्राईक.’

अन्य भारतीय खेळाडूंचे ट्विट-

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा किंग कोहली साजरा करतो त्याच्या बाॅडीगार्डचा वाढदिवस, पहा व्हीडिओ

सुधर जाओ! विरेंद्र सेहवागच्या पाकिस्तानवरील त्या ट्वीटला ४ तासांत १८ हजार रिट्वीट

-पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहताना विराटने चाहत्यांना दिला शांत रहाण्याचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment