इंडोनेशियन फुटबॉल चाहत्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन गेम्सच्या स्टेडियमची तोडफोड केली आहे.
स्रीविजया विरुद्ध अरेमा या फुटबॉल क्लबमध्ये सुरू असलेल्या सामन्यात हा प्रकार घडला. सुमात्रा येथील पालमबंग येथे गेलोरा स्रीविजया स्टेडियम मध्ये हा सामना सुरू होता.
या सामन्यात स्रीविजया संघ 3-0 असा घरच्याच मैदानावर पराभूत झाल्याने यावेळी चिडलेल्या चाहत्यांनी स्टेडियममधील खुर्च्या फेकल्या.
पालमबंग आणि जकार्ता येथे 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान एशियन गेम्स होणार आहे. तसेच या स्टेडियमची आत्ताच डागडुजी करण्यात आली आहे होती.
“गेली दहा वर्षे मी या स्टेडियमची देखरेख करत आहे. पण असा प्रकार मी पहिल्यांदाच बघत आहे”, असे स्टेडियमचे सुरक्षा अधिकारी रुस्ली नवी म्हणाले.
“या स्टेडियममधील 335 खुर्च्यांचे नुकसान झाले आहे. यातील काही खुर्च्या आम्ही बाहेरून मागवल्या आहेत. यामुळे मी खूप नाराज आहे”, असेही नवी म्हणाले.
यासंदर्भात पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे.
आॅलिंपिंक स्पर्धेनंतरची मोठी स्पर्धा असलेल्या या एशियन गेम्समध्ये 45 देशांतील 11,000 खेळाडू आणि 5000 अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–भारतीय स्क्वॅश संघ प्रशिक्षकाविनाच एशियन गेम्समध्ये खेळणार
–रोजगार हमी योजनेवर कामाला जाणाऱ्या माजी खेळाडूला क्रिडा मंत्रालयाचा मदतीचा हात