---Advertisement---

INDvAUS T20: मोहालीत आली हार्दिक नावाची त्सुनामी! टीम इंडियाचा 208 धावांचा एव्हरेस्ट

On: मंगळवार, सप्टेंबर 20, 2022 8:49 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरुवात झाली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर के एल राहुलने झळकावले अर्धशतक, सूर्यकुमार यादवच्या 46 तसेच अखेरीस हार्दिक पंड्याच्या झंझावाती अर्धशतकामुळे भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 208 धावा उभारल्या.

 

भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी सलामी दिली. रोहितने दुसऱ्या षटकात पॅट कमिन्स याला एक षटकार व एक चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकात तो बाद झाला. त्याने 9 चेंडूवर 11 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीवर हेजलवूड व झंपा यांनी दबाव आणला. तो 7 चेंडूवर 2 धावा करत बाद झाला. भारतीय संघ पावर प्लेमध्ये 2 बाद 46 धावा करू शकला. मात्र त्यानंतर राहुल व सूर्यकुमार यादव यांनी कोणतेही दडपण न घेता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. धावगती अजिबात कमी होऊ न देता त्यांनी षटकार चौकार मारणे सुरू ठेवले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. राहुल 55 धावांची खेळी करत तंबूत परतला. तर सूर्यकुमारने 25 चेंडूवर 46 धावा फटकावल्या. हार्दिक पंड्याने सुरुवातीपासून आक्रमण केले. अक्षर पटेल व दिनेश कार्तिक फारसे योगदान देऊ शकले नाहीत. मात्र, हार्दिकने 25 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक करत भारताला 200 धावांच्या दिशेने नेले.

हार्दिकने अखेरच्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकत 30 चेंडूवर 71 धावांची आतिशी खेळी केली. यात 7 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियासाठी एलिसने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

कार्तिकला घ्या ‘त्याला’ काढा! माजी दिग्गजाची टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर मोठी प्रतिक्रिया
पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीगमध्ये परमार ऑल स्टार्स, आरएस कॅनन्स, बॉल ब्रेकर्स, द व्हर्लविंड्स संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---