गुरुवारी (7 नोव्हेंबर) राजकोटमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (T20 Series) दुसरा सामना पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीत पार पडला होता. पहिल्या टी20 सामन्यात बांगलादेशने विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारत आणि बांगलादेश संघाला प्रदूषणाचा सामना करावा लागला होता. आता राजकोटमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यातही अडथळा येण्याची चिन्हे दिसत आहेत.
हवामान खात्यानुसार 6 नोव्हेंबरला संध्याकाळी किंवा 7 नोव्हेंबरला सकाळी गुजरातच्या किनारपट्टी प्रदेशात महा चक्रीवादळ येईल. त्यामुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. राजकोट हे शहर ज्या भागात येते त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी वारा येणार आहे.
मुसळधार पावसाबरोबरच 120 किमी प्रती तास असा हवेचा वेग असू शकतो. त्यामुळे सामन्यात अडथळा येऊ शकतो. क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) आणि भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विनने (R Ashwin) या अंदाजावर चिंता व्यक्त केली आहे.
हर्षा भोगलेने परिस्थितीवर ट्वीट केले आहे की, ‘6 आणि 7 नोव्हेंबरला गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. टी20 सामना राजकोटमध्ये होणार आहे. आशा आहे की चक्रीवादळा दरम्यान राजकोटमध्ये लोक सुरक्षित असतील. यावर्षी हवामानाचा आंदाज अनिश्चित ठरत आहे.’
And now, with a game in Rajkot ahead, news of a cyclone on the West coast on Nov 06/07 with a danger alert issued to fishermen on the Saurashtra coast. Hope it isn't dangerous for the people living there. The weather has been most unpredictable this year.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 4, 2019
अश्विननेही ट्वीट करत लिहिले आहे की, ‘निसर्ग आपली नाराजी व्यक्त करत आहे.’ जर हा सामना रद्द झाला तर भारतीय संघासाठी ही वाईट बातमी असणार आहे. कारण भारतीय संघ दिल्लीतील पहिला टी20 सामना पराभूत झाल्याने मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.
Nature is showing its displeasure! https://t.co/9q4zoFiLcD
— Ashwin ???????? (@ashwinravi99) November 4, 2019






