भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज नागपूरच्या मैदानावर खेळला जाईल. दोन्ही संघांनी या मालिकेतील एक- एक सामना जिंकला आहे, यामुळे नागपूरमधील सामना निर्णायक ठरेल.
दोन्ही संघ आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात बदल दिसण्याची शक्यता आहे.
भारतीय संघाचे सलामीचे नेतृत्व कर्णधार रोहित शर्मा आणि डावखुरा सलामीवीर शिखर धवन करणार आहेत. दोघेही उत्कृष्ट फाॅर्ममध्ये आहेत. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या सामन्यात रोहितने 85 धावा केल्या, तर धवननेही 31 धावा केल्या. रोहित आणि धवन यांच्यात 118 धावांची सलामीची भागीदारी झाली होती.
त्यामुळे रोहित आणि शिखर यांची जोडीच सलामीला फलंदाजीसाठी येईल. त्याचबरोबर मधल्या फळीची जबाबदारी केएल राहुल आणि श्रेयस अय्यरवर कायम असेल. राहुलला अजून या मालिकेत खास काही करता आलेले नाही. पण तरीही त्याला संघव्यवस्थापन अजून एक संधी देण्याची दाट शक्यता आहे.
श्रेयसने मात्र बांगलादेश विरुद्धच्या दोन्ही सामन्यात लहान पण महत्त्वाची खेळी खेळली आहे. तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेलाही जरी खास काही करता आले नसले तरी तोही या अंतिम 11 मध्ये स्थान कायम ठेवण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर आज यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. पंतची कामगिरी मागील काही दिवसापासून चिंताजनक राहिली आहे. त्यामुळे सॅमसनला एक संधी भारतीय संघव्यवस्थापन देण्याचा विचार करु शकतात.
मधल्या फळीची जबाबदारी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर वर असेल. कसोटी संघातून वगळल्यानंतर राहुल अद्याप रंगात दिसू शकलेला नाही. श्रेयसने लहान पण महत्त्वाची खेळी खेळली आहे. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दोघांचीही मोठी जबाबदारी असेल. तसेच शिवम दुबे यांला अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकेल. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सॅमसनने शानदार फलंदाजी केलीआहे.
त्याचबरोबर अष्टपैलू कृणाल पंडयाही अंतिम 11मध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. त्याने या मालिकेत खास कामगिरी केली नसली तरी त्याची तळातील फलंदाजीची क्षमता आणि गोलंदाजी भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरु शकते.
वेगवान गोलंदाजीमध्ये दीपक चहर कमान सांभाळेल. त्याला शार्दुल ठाकूरची साथ मिळू शकते. मागील दोन्ही सामन्यात खलील अहमदने केलेल्या खराब कामगिरीचा त्याला आजच्या सामन्यात फटका बसू शकतो. त्याला अंतिम 11च्या संघातून बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. त्याच्याऐवजी शार्दुलला संधी मिळेल.
याबरोबरच फिरकी गोलंदाजीची जबाबदारी युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर सांभाळतील. या दोघांनीही दुसऱ्या टी20 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या टी -20 सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक)), कृणाल पंड्या, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले…
वाचा 👉 https://t.co/7RfUWr4R4H 👈 #म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
रोहित शर्माने चुकून अंपायरलाच शिवी दिली, यापुढे घेणार कॅमेऱ्यासमोर बोलताना काळजी.
वाचा 👉 https://t.co/1k2QlLoAfb 👈 #म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #Rohit— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019