पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२६ मार्च) होत आहे. या सामन्यासाठी झालेली नाणेफेक इंग्लंडने जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून प्रत्येकी १ खेळाडू वनडे पदार्पण करत आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघातील अंतिम ११ जणांमध्ये बदल होणार हे निश्चित होते. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पहिल्या वनडेदरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्याजागी रिषभ पंतला दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे.
तसेच या सामन्यात जोस बटलर इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे. कारण इंग्लंडचा नियमित कर्णधार ओएन मॉर्गन बोटाच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. तसेच सॅम बिलिंग्सही दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघात लियाम लिव्हिंगस्टोनला संधी मिळाली असून तो देखील वनडे पदार्पण करत आहे. त्याचबरोबर डेव्हिड मलानला अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली आहे. याबरोबरच इंग्लंडने मार्क वूडच्या ऐवजी रिस टोप्लीला संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ
भारतीय संघ –
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, रिषभ पंत.
इंग्लंड संघ –
जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, रिस टोप्ली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रनमशीन’ विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी; सचिन, पाँटिंगच्या विश्वविक्रमांची करु शकतो बरोबरी
असा क्रिकेटपटू ज्याने, आठ वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर सिनेसृष्टीत आजमवले नशीब; धोनीवरही केले होते आरोप
असे ‘बाप- लेक’ क्रिकेटर, ज्यांनी एकाच सामन्यात खेळताना केली ‘बाप’ कामगिरी






