---Advertisement---

‘रनमशीन’ विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी; सचिन, पाँटिंगच्या विश्वविक्रमांची करु शकतो बरोबरी

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 12:46 PM
---Advertisement---

आज (२६ मार्च) भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल तर, इंग्लंड संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तसेच कर्णधार विराट कोहलीला या सामन्यात दिग्गज खेळाडूंना मागे टाकत विश्वविक्रम करण्याची संधी असणार आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावांचा डोंगर उभा केला होता. यामध्ये कर्णधार विराट कोहलीने ५६ धावा केल्या होत्या. तसेच आज होणाऱ्या सामन्यात जर त्याला शतक झळकवण्यात यश आले, तर तो दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगची बरोबरी करू शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. तसेच सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत दुसऱ्या स्थानी रिकी पाँटिंग आहे. पाँटिंगने आतापर्यंत ७१ शतकं ठोकली आहेत. तर विराट ७० शतक झळकावत तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे शतक झळकवताच विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रिकी पाँटिंगची बरोबरी साधेल.

वनडे क्रिकेटमध्ये रिकी पॉंटिंगच्या नावे कर्णधार म्हणून सर्वाधिक २१ शतक आहेत. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे आतापर्यंत २० शतकं आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात जर विराटने शतक झळकावले तर तो वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत देखील पॉंटिंगची बरोबरी साधू शकतो.

तसेच त्याला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. सचिनने मायदेशात खेळतांना एकूण २० वनडे शतकं झळकावले आहेत. तसेच विराटने १९ शतकं झळकावले आहेत. आजच्या सामन्यात शतक झळकावत तो माजी फलंदाज सचिन तेंडुलकरची बरोबरी साधू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---