---Advertisement---

INDvENG: दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित, विराटला मोठे रेकॉर्ड करण्याची संधी, जाणून घ्या खास आकडेवारी

On: गुरूवार, मार्च 25, 2021 10:00 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार दि. 26 मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे.

या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना अनेक मोठे विक्रम करण्याची संधी आहे. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही विक्रमांबद्दल सांगणार आहोत, जे दोन्ही संघातील खेळाडू या सामन्यात आपल्या नावे करु शकतात.

1. या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध 55 व्या एकदिवसीय विजयाची नोंद करण्याची संधी असेल. तर त्याचवेळी इंग्लंडला 43 वा सामना जिंकण्याची संधी असेल. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 101 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 54 तर इंग्लंडने 42 सामने जिंकले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले आहेत आणि दोन्ही संघांमधील 3 सामने अनिर्णीत आहेत.

2. गहुंजे स्टेडियमवर आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात 2 वनडे सामने खेळले गेले असून, दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. या मैदानावर इंग्लंड संघाविरुद्ध सलग तिसर्‍या विजयाची नोंद करण्याची संधी भारतीय संघाला असेल. तर त्याचबरोबर इंग्लंडच्या संघाला भारताविरुद्धच्या पहिल्या विजयाची संधी असेल.

3. या सामन्यात रोहित शर्माने 6 षटकार खेचले तर तोे एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 250 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरणार आहे.

4. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके आहेत. या सामन्यात जर त्याने शतक ठोकले तर तो रिकी पॉन्टिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांची बरोबरी करेल.

5. श्रेयस अय्यर दुखापतीनंतर बाहेर पडल्यामुळे सूर्यकुमार यादवला या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकेल. तो भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 235 वा खेळाडू ठरु शकतो.

6. या सामन्यात विराट कोहलीने 28 चेंडूंचा सामना केला तर त्याच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13000 चेंडूंचा सामना केल्याची नोंद होईल. सचिन, गांगुली आणि द्रविडनंतर एकदिवसीय क्रिकेटमधील 13000 चेंडूंचा सामना करणारा तो चौथा भारतीय फलंदाज बनणार आहे.

7. हार्दिक पंड्याने जर 4 षटकार ठोकले तर एकदिवसीय क्रिकेटमधील 50 षटकार तो पूर्ण करेल. असे करणारा तो 13 वा भारतीय क्रिकेटपटू होईल.

8. रोहित शर्माने जर या सामन्यात 14 षटकार ठोकले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 षटकार ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरणार आहे. ख्रिस गेल आणि ब्रॅडेन मॅक्युलम यांनी या अगोदर हा विक्रम केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

INDvENG: भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी, तर इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, दुसऱ्या वनडेबद्दल जाणून घ्या सर्वकाही

ब्रेकिंग! इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनची उर्वरित वनडे मालिकेतून माघार, ‘या’ खेळाडूच्या हाती नेतृत्त्वपद

कोहली किंवा धोनी नाही तर ‘हा’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---