मंगळवार रोजी (२३ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात गहुंजे स्टेडियम, पुणे येथे झालेला पहिला वनडे सामना इंग्लंडने ६६ धावांनी गमावला. यासह पाहुणा संघ मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. या सामन्यादरम्यान भारतासह इंग्लंडच्याही काही क्रिकेटपटूंना दुखापतीला सामोरे जावे लागले. यात इंग्लंडचा संघनायक ऑयन मॉर्गन याचा समावेश होता. यानंतर आज (२५ मार्च) मॉर्गनने स्वत: उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे.
मॉर्गनच्या अनुपस्थित यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर उर्वरित दोन सामन्यात संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.
पहिल्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना मॉर्गनच्या हाताला चेंडूत लागल्याने अंगठ्याला व बोटाला मोठी जखम झाली होती. यामुळे त्याच्या हाताला ४ टाकेही पडले आहेत. यानंतर मॉर्गनने उर्वरित २ वनडे सामन्यातून माघार घेण्याचे ठरवले आहे.
आपल्या निर्णयाबद्दल बोलताना मॉर्गन म्हणाला की, “मी आज माझ्या दुखापतीवर दुर्लक्ष करुन सराव करत होतो. परंतु यावेळी जखमेमुळे मला झेल पकडताना त्रास होत होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कोणताही खेळाडू भर मैदानात स्वत:ला लपवू शकत नाही. त्यामुळे मी माघार उरलेल्या सामन्यांतून माघार घेणे हाच शहानपणाचा निर्णय आहे. मला अशी गंभीर दुखापत होणे अतिशय दुर्देवी आहे. पण या गोष्टी माझ्या हातात नाहीत.”
आपला संघ सहकारी जोस बटलरवर संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपवण्याबाबत मॉर्गन म्हणाला, “बटलरवर मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या अनुपस्थित तो उर्वरित वनडे मालिकेत त्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडेल.”
JUST IN: Eoin Morgan has been ruled out of the #INDvENG ODI series with a hand injury.
Jos Buttler will captain the team in his absence. pic.twitter.com/aMJ4iy23I0
— ICC (@ICC) March 25, 2021