---Advertisement---

कानपूर कसोटीत अखेरच्या दिवशी श्रीकर भरत करणार साहाऐवजी यष्टीरक्षण, बीसीसीआयने सांगितले कारण

---Advertisement---

कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ग्रीनपार्क स्टेडियमवर गुरुवारपासून खेळला गेला. या सामन्याचा सोमवारी (२९ नोव्हेंबर) अखेरचा दिवस होता. या दिवशी भारताकडून क्षेत्ररक्षणासाठी वृद्धिमान साहा ऐवजी श्रीकर भरत राखीव यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरला होता. याबद्दल बीसीसीआयने सामना सुरू असताना माहिती दिली.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार वृद्धिमान साहाच्या मानेत दुसऱ्या डावात यष्टीरक्षक करताना वेदना जाणवल्या. त्यामुळे यष्टीरक्षक करताना त्याच्या हालचालींवर परिणाम होत आहे. त्यामुळे सामन्याच्या ५ व्या दिवशी केएस भरत त्याच्याऐवजी राखीव यष्टीरक्षक म्हणून मैदानात उतरेल.’ पाचव्या दिवशी सामन्यातील अखेरचा डाव खेळला गेला.

या सामन्यात साहाला तिसऱ्या दिवशी देखील मानेच्या दुखापतीचा त्रास जाणवला होता, ज्यामुळे भरतनेच सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात राखीव यष्टीरक्षक म्हणून कामगिरी बजावली होती. त्याने राखीव यष्टीरक्षक म्हणून देखील उत्तम कामगिरी केली होती. भरतने पहिल्या डावात १ यष्टीचीत केले होते, तर २ झेल घेतले होते.

पण, असे असले तरी, साहा भारताच्या दोन्ही डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याला पहिल्या डावात १ धावच करता आली होती. मात्र, दुसऱ्या डावात साहाने महत्त्वाच्या वेळी अर्धशतकी खेळी करत भारतीय संघासाठी मोलाचा वाटा उचलला. त्याने महत्त्वपूर्ण नाबाद ६१ धावांची खेळी केली.

त्याने यावेळी श्रेयस अय्यरसह ७ व्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली, तर अक्षर पटेलसह नाबाद ६७ धावांची भागीदारी केली. अय्यरने ६५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने ७ बाद २३४ धावांवर डाव घोषित केला आणि पहिल्या डावातील ४९ धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडसमोर २८४ धावांचे आव्हान ठेवले.

महत्त्वाच्या बातम्या – 

अबू धाबीच्या फलंदाजाने ११ चेंडूंत ठोकल्या ५८ धावा; गेलसह फलंदाजी करताना काढला गोलंदाजाचा घाम

‘ते दोघे कठीण काळातून जात आहेत, पण…’, रहाणे-पुजाराच्या फॉर्मबद्दल फलंदाजी प्रशिक्षकांचे भाष्य

तू अशी जवळी रहा! विराटने शेअर केला ‘कपल पिक्चर’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---