न्यूजीलँड संघ भारत दौऱ्यावर आला असून या मालिकेत दोन्ही संघ ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहेत. या सामन्यांसाठी होणारी तिकीट विक्री गेल्याच आठवड्यात सुरु झाली आहे.
पहिला वनडे मुंबईत, दुसरा पुण्यात तर तिसरा कानपुरला होणार आहे.
कानपुर वनडे (तिसरी वनडे )
यातील कानपुर वनडेची तिकिटे सर्वात स्वस्त आहेत. कानपुर वनडे सामन्यासाठीचे तिकिटाचे दर हे ३००, ५००, १३००, १८००, २५००, ३०००, ५००० आणि ६००० रुपये आहेत. bookmyshow.com प्रमाणे येथील ३०० रुपयांचे तिकीट विकले गेले आहेत.
मुंबई वनडे (पहिली वनडे)
या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्याची अर्थात मुंबई सामन्याची तिकीट विक्रीही पूर्वीच सुरु झाली आहे. ७५०, १५००,२०००, ३०००, ४००० आणि २५००० रुपये असे येथील तिकिटांचे दर आहेत. bookmyshow.com प्रमाणे येथील ७५० रुपयांचे तिकीट विकले गेले आहेत.
पुणे वनडे (दुसरी वनडे )
मालिकेत दुसरा वनडे सामना पुण्यात होणार असून याची तिकीट विक्री सर्वात आधी सुरु झाली. या सामन्यासाठी तिकिटांचे दर हे ८००, ११००, १७५०, २००० आणि ३५०० रुपये आहे. bookmyshow.com प्रमाणे येथील ८०० रुपयांचे तिकीट विकले गेले आहेत.
दिल्ली टी२० (पहिली टी२०)
येथे टी२० मालिकेतील पहिला सामना होणार आहे. हा अनुभवी गोलंदाज आशिष नेहराचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. या सामन्यासाठी तिकीटविक्री आजपासून सुरु झाली आहे. या सामन्यासाठी तिकिटांचे दर हे ३५०, ५००, ७५०, १०००, २५००, ५५०० आणि १०००० रुपये असे आहेत. paytm.com वर ही तिकीट विक्री सुरु आहे.
राजकोट आणि तिरुवनंतपुरम टी२० सामन्यासाठी अजून तिकीट विक्री सुरु झाली नाही.