दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी (INDvSA)भारताचा संघ जाहीर झाला. शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे, तर श्रेयस अय्यर उपकर्णधार आहे. टी20 विश्वचषकात राखीव असलेल्या अय्यर, रवि बिश्नोई आणि दीपक चाहर यांनाही वनडे संघात घेतले आहे. शुबमन गिल वरच्या फळीत खेळणार असून कुलदीप यादव आणि शाहबाज अहमद यांना देखील संघात निवडले आहे. तसेच रजत पाटीदार आणि मुकेश कुमार यांचे देखील भारताच्या मुख्य संघात पदार्पण झाले आहे.
रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि मुकेश कुमार (Mukesh Kumar) यांना प्रथमच भारताच्या वरिष्ठ संघात निवडले आहे. यामुळे भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यालाही भलताच आनंद झाला आहे. कार्तिक आणि पाटीदार हे आयपीएल 2022च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळले आहेत. कार्तिकने म्हटले की, सरफराज खान आणि बाबा इंद्रजीत यांच्या प्रदर्शनालाही डालवून चालणार नाही.
कार्तिकने ट्वीटरवर लिहिले, ‘रजत पाटीदारला वनडे संघात पाहून आनंद झाला. तो त्याचा हक्क आहे. मुकेश कुमार यालाही संघात पाहून चांगले वाटले. सरफराज खान आणि बाबा इंद्रजीत यांच्याबाबतही काहीतरी योजना करायला हवी. त्यांच्या शानदार प्रदर्शनाला दृष्टीआड करून चालणार नाही. दोघे खूपच छान खेळत आहेत.’
So happy to see Rajat patidar there , so deserves this selection ❤️
Well done to Mukesh Kumar too 👍
Now Sarfaraz Khan and Indrajith baba into the test scheme of things . Can't ignore such brilliant performers and performances.Theyve just been phenomenal
TALENT APLENTY 🙏🥂 https://t.co/2vpcoeMdBn
— DK (@DineshKarthik) October 3, 2022
पाटीदार आयपीएल 2022मध्ये आरसीबीमध्ये बदली खेळाडू म्हणून आला होता, मात्र त्याने चमकदार कामगिरी केली. त्याने 8 डावांमध्ये 55.50च्या सरासरीने एक शतक आणि 2 अर्धशतके करत 333 धावा केल्या. या स्पर्धेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 152.75 होता. पाटीदार-कुमार यांनी नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड ए विरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केली आहे.
या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान , मोहम्मद सिराज, दीपक चाहर
महत्वाच्या बातम्या-