---Advertisement---

INDvSA: रांची वनडेत इशानला भेटली आजी, तर शार्दुलला मिळाले पत्र! पाहाच तो खास व्हिडिओ

On: सोमवार, ऑक्टोबर 10, 2022 10:56 AM
Ishan Kishan
---Advertisement---

रांची येथे रविवारी (9 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने बाजी मारत मालिकेत कमबॅक केले आहे. भारताने दुसरा वनडे सामना 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यानंतर लोकल बॉय इशान किशन याने चाहत्यांची भेट घेतली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी त्याच्याभोवती ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी घेराव घातला होता. यावेळी त्याने काही जुन्या ओळखीच्या लोकांचीही भेट घेतली. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडियावर शेयर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये इशान किशन (Ishan Kishan) याच्यासोबत एक महिला दिसत आहे. ती त्याची लांबची आजी असून त्यांनी म्हटले, “मी म्हटले होते ना जेव्हा तू येतो तेव्हा तू माझ्या घराच्या काचा तोडतो. आज तू तसाच खेळला.” यावर इशानही त्यांच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवतो. मग इशानही म्हणतो, “आजी जेवायला कधी बोलावणार?”, त्याचे उत्तर देताना ती आजी म्हणते, “केव्हा येणार मग?”

इशान बिहारच्या पटना येथील असून त्याच्याबरोबरच शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) यालाही चाहत्याकडून अप्रतिम भेटवस्तू मिळाली आहे. इशान जाण्यासाठी निघतो तेव्हा एक चाहता कॅमेरासमोर कागद हलवतो, ज्यावर लिहिले असते ‘शार्दुल ठाकुर 54’ हे पाहून इशान थांबतो आणि तो कागद हातात घेऊन इशान म्हणतो, “येथे फक्त मलाच प्रेम नाही मिळाले, क्रिकेटचे चाहते सगळ्यांनाच आपले प्रेम देत आहेत. येथे असलेला एक चाहता मला आग्रह करत आहे की मी हे पत्र शार्दुलला दाखवावे.” काही वेळाने इशान शार्दुलला ते पत्र देतो आणि शार्दुलही ते पत्र पाहून खूष झाला असून त्याने धन्यवाद देखील म्हटले आहे.

दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी रीझा हेंड्रिक्स-एडन मार्क्रम यांच्या 129 धावांच्या भागादारीवर 50 षटकात 7 विकेट्स गमावत 278 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना किशन-अय्यर जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 155 चेंडूत 161 धावांची भागीदारी रचली. किशनने 93 आणि श्रेयस अय्यर याने नाबाद 113 धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा नाद करायचा नाय! आव्हानाचा पाठलाग करताना ‘इतक्यांदा’ मिळवलाय विजय, ऑस्ट्रेलिया- इंग्लंड लांबच
मूर्ती लहान, कीर्ती महान! इशानने 24 वर्षांच्या वयात केला ‘हा’ पराक्रम, ‘माही भाई’ टेबल टॉपर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---