भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (11 ऑक्टोबर) दिल्ली येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या दृष्टीने विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत, मात्र दिल्लीच्या आताच्या अरूण जेटली क्रिकेट स्टेडियम आणि आधीचे फिरोजशहा कोटला स्टेडियमवर दोन्ही संघाचे काय विक्रम आहेत, हे आपण जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिकेने लखनऊ येथे झालेला सामना 9 धावांनी जिंकला तर रांची येथे झालेला सामना भारताने 7 विकेट्सने जिंकला. भारताने दिल्लीच्या मैदानावर शेवटचा वनडे सामना 2019मध्ये खेळला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 35 धावांनी पराभूत केले होते.
भारत आणि दिल्लीचे मैदान आणि वनडे सामने
भारताने या मैदानावर आतापर्यंत 21 वनडे सामने खेळले आहेत. भारताला त्यातील केवळ 12 सामने जिंकता आल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. तसेच त्यातील एक सामना रद्द झाला होता, मात्र भारताने दिल्लीत 2014 मध्ये वनडे सामना जिंकला होता. त्यानंतर झालेल्या दोन्ही सामन्यात भारत पराभूत झाला आहे. ऑस्ट्रेलियाबरोबरच न्यूझीलंडनेदेखील भारताला हरवले होते. 2016मध्ये खेळला गेलेला तो वनडे सामना भारताने अवघ्या 6 धावांनी गमावला होता.
A vital 5⃣0⃣-run partnership between @ShreyasIyer15 and @IamSanjuSamson 👏👏#TeamIndia within touching distance of a win now. 👌
Follow the match ➡️ https://t.co/6pFItKiAHZ#INDvSA pic.twitter.com/k1Ex16kxZH
— BCCI (@BCCI) October 9, 2022
दक्षिण आफ्रिका आणि दिल्लीचे मैदान
दक्षिण आफ्रिकेने दिल्लीच्या या मैदानावर भारताविरुद्ध एक टी20 सामना आणि एक कसोटी सामना खेळला आहे. त्यातील 2015मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा 337 धावांनी पराभव केला होता. तसेच याचवर्षीच्या जून महिन्यात दोन्ही संघ टी20मध्ये समोरासमोर आले. त्या सामन्यात भारत 7 विकेट्सने पराभूत झाला होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने 2016मध्ये खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव केला होता.
दिल्ली आणि वनडे सामन्याचे रेकॉर्ड्स
या मैदानावर आतापर्यंत 26 वनडे सामने खेळले गेले, मात्र दोन वेळाच संघांनी 300 धावसंख्याचा यशस्वी पार केली होती. वनडे विश्वचषक 2011मध्ये वेस्ट इंडिजने नेदरलॅंड्स विरुद्ध 8 विकेट्स गमावत 330 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानने 2005मध्ये 8 विकेट्स गमावत 303 धावा केल्या होत्या. भारताचे या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1987मध्ये केला होता.
दक्षिण आफ्रिका भारतात केवळ एकच द्विपक्षीय वनडे मालिका जिकंला आहे. ही मालिका त्यांनी 2015च्या दौऱ्यात जिंकली होती. 2005मध्ये त्यांनी चार सामन्यांची मालिका बरोबरीत राखली होती, तर 1992, 1996, 2000 आणि 2010मध्ये मालिका गमावल्या होत्या.
भारताने मार्च 2021 पासून सात वनडे मालिका खेळल्या असून त्यातील एकच मालिका गमावली आहे आणि ती मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्धच गमावली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय
‘यॉर्कर किंग’ बुमराहला कपिल पाजींनी करून दिली राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव, एकाच ओळीत केले ‘क्लीन बोल्ड’
याचं करायचं काय? सराव सामन्यातही सपशेल अपयशी ठरला रिषभ; 17 चेंडू खेळून पण…