भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊ येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारत शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारताच्या संघामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदार याचा त्यामध्ये समावेश आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतो. यावेळी त्याने त्याच्या मुलाखतीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आपले आदर्श मानतो, असे विधान केले आहे.
एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रजत पाटीदार (Rajat Patidar) म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा हे माझे आदर्श आहेत. विराटसोबत खेळताना आणि त्याच्यासोबत भागीदारी करणे हे खूप विशेष आहे. ते सर्व फॉर्मेटचे खेळाडू आहेत आणि अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. आपल्या आदर्श व्यक्तिसोबत ड्रेसिंग रूम शेयर करण्याची संधी सहसा कोणाला मिळत नाही आणि जी त्याला मिळाली ते खूप खास असते.”
आयपीएल दरम्यान रजतने विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत झालेल्या संवादाबाबतही बोलताना म्हटले, “ते माझ्या फलंदाजीबाबत आपले मत व्यक्त करतात. त्यावेळी त्यांनी मला फलंदाजीविषयी काही सूचनाही दिल्या ज्यामुळे मला फलंदाजीमध्ये सुधारणा करता येईल. त्यांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड याच्या फलंदाजीचेही विशेष कौतुक केले.”
रजतने मागील काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या 76 डावांमध्ये एकूण 3230 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 10 शतकांचा समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना प्लेऑफ आणि क्वालिफायर सामन्यात शतक आणि अर्धशतक केले होते. तो प्लेऑफच्या सामन्यात शतक करणारा पहिला भारतीय अनकॅप्ड खेळाडू ठरला होता. त्याने आयपीएल 2022च्या हंगामात 152.75च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 333 धावा केल्या.
रजतने 2022च्या रणजी ट्रॉफीच्या हंगामात मध्ये प्रदेशला विजेतेपद जिंकून देण्यात महत्वाची भुमिका बजावली. त्याने एकाही सामन्यात 53च्या खाली धावा केल्या नाही. या स्पर्धेत त्याने 83.75च्या सरासरीने 335 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त
क्रिकेटचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्मलेला मॉर्ने मॉर्केल, जाणून घ्या खास १० गोष्टी