---Advertisement---

INDvSA: इंदोरच्या टी20मध्ये विराट-राहुलची रिप्लेसमेंट कोण? ‘या’ खेळाडूंना संधी

---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA)यांच्यात तिसरा टी20 सामना मंगळवारी (4 ऑक्टोबर) इंदोर येथे खेळला जाणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार या सामन्यामध्ये भारताचा उपकर्णधार केएल राहुल आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली खेळणार नाही. यामुळे भारताच्या प्लेईंग इलेवनमध्ये बदल दिसणार आहेत. हा सामना होळकर स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारत या मालिकेत 2-0ने आघाडीवर असून तिसरा जिंकत मालिकेत दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा हेतू असणार आहे, मात्र कोहली-राहुलच्या अनुपस्थितीत कोण घेणार त्यांची जागा असे प्रश्न निर्माण होत आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) याने दुसऱ्या टी20मध्ये नाबाद 49 धावा केल्या. भारताच्या विजयानंतर विराट गुवाहाटीवरून मुंबईला रवाणा झाला आहे. त्याच्यासोबत केएल राहुल (KL Rahul) यालाही तिसऱ्या टी20साठी आराम दिला जाऊ शकतो. राहुलने दोन्ही टी20 सामन्यात अर्धशतके केली आहेत. त्याने तिरूअनंतपूरमच्या फलंदाजांसाठीच्या कठीण खेळपट्टीवर अर्धशतक ठोकले होते. नंतर त्याने गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 28 चेंडूत 57 धावांची खेळी केली. आता या दोघांच्या जागी श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद यांना संधी मिळू शकते. तसेच विराट-राहुल यांच्याबाबतीत अधिकृत माहिती बीसीसीआयने जाहीर केलेली नाही.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारताचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच तो टी20 विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्येही आहे. पुरूषांचा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. यातील पहिला सामना 16 ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यात खेळला जाणार आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर 23 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. त्यासाठी ही टी20 मालिका सराव म्हणून दोन्ही संघासाठी महत्वाची आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, आर अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंगः टीम इंडियाचा संकट वाढलं, भारताचा मोठा खेळाडू वर्ल्डकपबाहेर
सूर्याला रोखण्यासाठी 662 आंतरराष्ट्रीय बळी घेणाऱ्या गोलंदाजाने दिला सल्ला; म्हणाला…
एबी पुन्हा येतोय! पुढील वर्षी आयपीएलमध्ये दिसण्याचा चाहत्यांना दिला शब्द

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---