मुंबई । यावर्षी ३० मे ते १४ जूलै या काळात ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यापुर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा हा दौरा १३ मार्च रोजी संपणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा १५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडसमितीची मुंबई येथे यासाठी बैठक होणार आहे. संघ निवडताना निवडसमितीची मुख्यकरुन विश्वचषक २०१९चा विचार करुनच संघ निवड करणार आहे.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार या मालिकेतील काही सामने किंवा संपुर्ण मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते.
२३ मार्चपासून आय़पीएल २०१९ ला सुरुवात होत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ थेट विश्वचषकातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे.
या मालिकेत अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात येऊ शकते. परंतु हे सर्व करताना ऑस्ट्रेलिया संघाला याचा फायदा होणार नाही याचाही विचार केला जाणार आहे. भारताने २०१८मध्ये अनेक परदेश दौरे केले आहेत. यात वेगवान गोलंदाजांना विश्रांती मिळाली नाही. यामुळे या मालिकेत त्याबद्दल सकारात्मक विचार केला जाऊ शकतो.
कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील २ सामने तसेच टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे ह्या मालिकेत तो नक्कीच खेळताना दिसेल.
२४ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाबरोबर २ टी२० सामने खेळणार आहे. पहिला सामना विशाखापट्टनम तर दुसरा सामना बेंगलोरला होणार आहे.
त्यानंतर 2 मार्चपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील पहिला सामना हैद्राबादला होणार आहे. त्यानंतर नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली येथे वनडे सामने होतील.
टी20 सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. तर वनडे सामने दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.
ही मालिका दोन्ही संघासाठी मेमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
या मालिकेतील केवळ एकच सामना महाराष्ट्रात होणार आहे. हा मालिकेतील दुसरा सामना असून तो ५ मार्च रोजी नागपुर येथे होणार आहे.
असा असेल ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा –
टी20 मालिका –
पहिला टी20 सामना – 24 फेब्रुवारी – बंगळूरु – वेळ: संध्या. 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना – 27 फेब्रुवारी – विशाखापट्टणम – वेळ: संध्या. 7.00 वाजता
वनडे मालिका –
पहिला वनडे सामना – 2 मार्च – हैद्राबाद – वेळ: दुपारी 1.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 5 मार्च – नागपूर – वेळ: दुपारी 1.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 8 मार्च – रांची – वेळ: दुपारी 1.30 वाजता
चौथा वनडे सामना – 10 मार्च – मोहाली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
पाचवा वनडे सामना – 13 मार्च – दिल्ली – वेळ: दुपारी 1.30 वाजता
महत्त्वाच्या बातम्या-
–संपुर्ण यादी- शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा, स्मृती मानधनासह या खेळाडूंना मिळणार पुरस्कार
–संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
–भारताच्या सुरेश रैनासह हे ४ आहेत जाॅंटी रोड्सचे आवडते क्षेत्ररक्षक
–सुरेश रैनाच्या निधनाच्या सर्व बातम्या खोट्या, स्वत: रैनानेच केला खुलासा