वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी (दि. 22 सप्टेंबर) खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 1.30 वाजता खेळला जाणार आहे. यापूर्वी उभय संघात 1 वाजता नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय कर्णधार केएल राहुल याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
केएल राहुल (KL Rahul) याने नाणेफेक जिंकल्यानंतर सांगितले की, भारतीय संघात 5 धुरंधरांचे पुनरागमन झाले आहे. त्यात ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आर अश्विन आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने सांगितले की, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क या सामन्यात खेळणार नाहीत. तसेच, डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श डावाची सुरुवात करतील.
#TeamIndia have won the toss and elect to bowl first in the 1st ODI against Australia.
Live – https://t.co/H6OgLtww4N… #INDvAUS pic.twitter.com/s8Y71dRLMr
— BCCI (@BCCI) September 22, 2023
रोहित-विराटला आराम
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची मदार केएल राहुल (KL Rahul) याच्या खांद्यावर आहे.
अलीकडची कामगिरी
भारतीय संघाने नुकतेच आशिया चषक 2023 स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात जबरदस्त आत्मविश्वासाने भरलेला असेल. या सामन्याद्वारे भारतीय संघ मालिकेची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, ऑस्ट्रेलिया संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली. या मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. मात्र, पुढील तिन्ही सामने जिंकण्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला यश आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-3ने गमावली. अशात ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेपूर्वी लयीत येण्याचा प्रयत्न करतील. (INDvsAUS India have won the toss and have opted to field)
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक
पाहावं ते नवलंच! Umpireच्या अंगात संचारला John Cena, त्याच्याच स्टाईलमध्ये फेटाळली गोलंदाजाची अपील- Video