कोविड-१९ महामारीनंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताला २-१ असा पराभव पत्करावा लागला असला, तरी भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला अटीतटीची लढत दिली. पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाने अखेरच्या सामन्यात १३ धावांनी विजय मिळवून आपली प्रतिष्ठा राखली. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडू अत्यंत आनंदित झाले. बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळविल्यानंतर खेळाडूंनी ट्विटरद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
भारताने जिंकला अखेरचा वनडे सामना
भारतीय संघाला सिडनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे ६६ व ५१ धावांनी पराभव स्वीकारावे लागले होते. मालिकेतील अखेरचा सामना जिंकून, सन्मान राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर होते. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाने कर्णधार विराट कोहली आणि दोन अष्टपैलू हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३०२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार ऍरॉन फिंच व अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतके झळकावत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजी डगमगली आणि अखेर त्यांना १३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
खेळाडूंनी दिल्या विजयानंतर आपल्या प्रतिक्रिया
कॅनबेरा वनडेमधील विजयासोबतच भारतीय संघाने २०२० या वर्षातील पहिला वनडे विजय साकारला. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी ट्विटरवरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्वीट करत म्हटले, ‘मला या संघावर गर्व आहे. आता आम्ही टी२० मालिकेकडे मोर्चा वळवतोय.’
Proud of this team. ???????? We march forward. On to the T20s ???? pic.twitter.com/kDFutw1B3R
— Virat Kohli (@imVkohli) December 2, 2020
अखेरच्या वनडे सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक ६६ धावांची खेळी करणाऱ्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने ट्वीट केले की, ‘हा दिवस कायम स्मरणात राहील.’
A day to remember ???????????? #TeamIndia pic.twitter.com/K0p2kcm2iV
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) December 2, 2020
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला असला तरी, संघाच्या विजयाने तो खूश दिसला. त्याने ट्वीट करताना लिहिले, ‘सर्व संघाने एक उत्तम चरित्र आणि भावना दाखवली. आता टी२० मालिकेवर आमचे लक्ष आहे.
Character and spirit shown by the team! We're focused on the T20s now ???????? pic.twitter.com/Ie27M06yB3
— Shikhar Dhawan (@SDhawan25) December 2, 2020
आपल्या ९२ धावांच्या लाजवाब खेळीसाठी अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून निवडल्या गेलेल्या हार्दिक पंड्याने ट्वीट करता लिहिले, ‘एक महान चरित्र आणि लढत संपूर्ण संघाने दिली. आता टी२० ची बारी.’
Great character and fight from the team! Onto the T20s now ???? pic.twitter.com/nHXibH3uN6
— hardik pandya (@hardikpandya7) December 2, 2020
भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने ट्वीट करत म्हटले, ‘आम्हाला टी२० मालिकेआधी अशाच निकालाची आवश्यकता होती.’
Just the result we needed ahead of the T20s ???????? pic.twitter.com/HMi16A2D0H
— Shreyas Iyer (@ShreyasIyer15) December 2, 2020
टी२० मालिकेला होणार कॅनबेरामध्ये सुरुवात
वनडे मालिकेच्या समाप्तीनंतर ४ डिसेंबरपासून कॅनबेरा येथेच तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू होईल. भारतीय संघ सध्या टी२० क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया इंग्लंडपाठोपाठ दुसऱ्या स्थानी विराजमान असलेले दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी
ट्रेंडिंग लेख-
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू






