बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राममध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने रविवारी (18 डिसेंबर) 188 धावांनी विजय मिळवला. यामुळे पाहुण्या संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. या विजयाबरोबर केवळ खेळाडूंनीच नाहीतर भारताच्या संपूर्ण संघाने मोठ्या विक्रमाची नोंद नावावर केली आहे. बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी सामन्यांचे निकाल पाहिले तर सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसेल.
बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले गेले. ज्यामध्ये भारताने 10 सामने जिंकले, तर बांगलादेशला एकही सामना जिंकता आलेला नाही. बाकीचे दोन सामने अनिर्णात राहिले. या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना 2000मध्ये ढाका येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारत 9 विकेट्सने जिंकला. दुसरा सामना तब्बल 4 वर्षानंतर म्हणजे 2004मध्ये खेळला गेला. तोही सामना ढाकामध्ये खेळला गेला, तेथेही भारताने विजय मिळवला. आताही भारतच जिंकल्याने बांगलादेशची भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एकप्रकारे कसोटीच लागते, असे दिसून येत आहे.
या सामन्यात अनेक विक्रम केले गेले. यामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंचा सहभाग आहे. बांगलादेशचे विक्रम पाहिले तर नजमुल शांतो आणि झाकिर हसन या दोन्ही सलामीवीरांनी भारताविरुद्ध शतकी भागीदारी करण्याची कामगिरी केली. जी बांगलादेशच्या एकाही सलामीजोडीला करता आली नाही. त्याचबरोबर भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने बांगलादेशच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यामुळे तो चट्टोग्राम येथे 5 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला.
कुलदीपने या सामन्यात फलंदाजी करताना 40 धावा केल्या. गोलंदाजीतही त्याने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 8 विकेट्स घेतल्या. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा भारताचा पाचवा फिरकीपटू ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी हरभजन सिंग, आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी केली आहे.
WHAT. A. WIN! 👏👏#TeamIndia put on an impressive show to win the first #BANvIND Test by 188 runs 🙌🙌
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44N7IRe pic.twitter.com/Xw9jFgtsnm
— BCCI (@BCCI) December 18, 2022
बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरला ढाका येथे खेळला जाणार आहे. INDvsBAN Test result Team India lead from front & Bangladesh never won
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
असा जाणार भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये, जिंकायचेत फक्त ‘इतके’ सामने
पहिल्या कसोटीत टीम इंडियाच निघाली ‘शेर’, बांगलादेशला 188 धावांनी चारली धूळ