चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने भारताच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहचा एक भन्नाट झेल घेतला आहे. हा झेल घेतल्याबरोबरच भारताचा पहिला डावही ३३७ धावांवर संपुष्टात आला. स्टोक्सने घेतलेल्या या झेलाचे सध्या मोठे कौतुक होत आहे.
झाले असे की भारताच्या पहिल्या डावात ९ विकेट्स गेल्यानंतर जसप्रीत बुमराह ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. यावेळी ९६ व्या षटकात जेम्स अँडरसन गोलंदाजीसाठी आला. त्याने टाकलेला षटकातील ५ वा चेंडू फलंदाजी करत असलेल्या बुमरहाच्या बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेला गेला. त्याचवेळी पहिल्या स्लिमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सने उजवीकडे डाईव्ह मारत एकहाती शानदार झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात वाहवा झाली.
https://twitter.com/darknight49_/status/1358661548361699329
https://twitter.com/im_maqbool/status/1358661594842943488
पाचव्या दिवशी भारताला ३८१ धावांची गरज, तर इंग्लंडला ९ विकेट्सची गरज –
स्टोक्सच्या या झेलामुळे भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याआधी इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली.
यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
चौथ्या डावात ४२० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला चौथ्या दिवसाखेर १ बाद ३९ धावा करता आल्या आहेत. भाकताला अजून ५ व्या दिवशी विजयासाठी ३८१ धावांची गरज आहे, तर इंग्लंडला ९ विकेट्सची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
घरासोबत वासेही फिरले! ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यष्टिरक्षण सोडून चक्क करतोय गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
जो रुटची कमाल! १०० कसोटीत केलाय असा कारनामा की गावसकर, सचिन, कॅलिससारख्या दिग्गजांना पडलाय भारी