इंग्लंड महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांतील एकमेव कसोटी सामना गुरुवारी (14 डिसेंबर) मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू झाला. सामनाचा पहिला दिवस भारतीय संघासाठी अनुकूर ठरला. दिवसाखेर भारताने 7 विकेट्सच्या नुकसानावर 410 धावांपर्यंत मजल मारली. सोबतच एक खास विक्रम नावावर केला.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर () हिने या सामन्याची नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार हरमनचा हा निर्णय संघातील फलंदाजांनी योग्य ठरवला. सलामीवीर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांना मोठी खेळी करता आली नाही. पण त्यानंतर पाचही फलंदाज अप्रतिम खेळी करताना दिसल्या.
स्मृती मंधानाने 17, तर शेफालीने 19 धावा करून अनुक्रमे संघाला पहिला आणि दुसरा धक्का दिला. संघाची धावसंख्या 47 असताना या दोन महत्वाच्या विकेट्स गेल्यामुळे भारताच्या पुढच्या फलंदाजांवरील दबाव वाढला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सतीश शुभ आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी मात्र हा दबाव चांगल्या पद्धतीने पेलला. दोघिंनी अनुक्रमे 69 आणि 68 धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौर हिने 49, तर यस्तिका फाटिया हिने 66 धावा करून विकेट गमावली. स्नेह राणा हिनेही 30 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी दीप्ती शर्मा 60* आणि पूजा वस्त्राकर 4* भारतासाठी डावाची सुरुवात करतीतल. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांचे प्रदर्शन महत्वाचे असेल. भारताने पहिल्या डावात मोठी धावसंख्या केली, तर सामना इंग्लंडच्या हातून निसटू शकतो.
महिला क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या दिवसी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 1935 साली न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिल्या दिवशी 4 विकेट्सच्या नुकसानावर 431 धावा केल्या होत्या. यादीत दुसऱ्या क्रमांकावर गुरुवारी भारतीय संघाने जागा पक्की केली. इंग्लंडविरुद्ध गुरुवारी केलेल्या 410 धावांच्या जोरावर भारताने हा विक्रम नावावर केला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर लॉरेन बेल हिने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. केट क्रॉस, नेट सायव्हर ब्रँट,चार्ली डीन आणि सोफिया एक्लेस्टोन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (INDvsENG test second best performance by India in the history of women’s cricket)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: टॅमी ब्युमाँट, सोफिया डंकले, हेदर नाइट (कॅप्टन), नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनियल व्याट, ऍमी जोन्स (wk), सोफी एक्लेस्टोन, चार्ली डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर, लॉरेन बेल.
भारत: स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), सतीश शुभ, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर.
महत्वाच्या बातम्या –
IND vs SA । कसोटी मालिकेतून शमीचा पत्ता कट! समोर आली महत्वाची माहिती
कुलदीप यादवच्या वाढदिवसानिमित्त चहलने व्हिडिओ शेअर करत मागितली माफी; म्हणाला, ‘याच्यासाठी…’