भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मालिकेतील पहिला वनडे सामना मंगळवारी (10 जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार-फलंदाज रोहित शर्मा याने 2023ची सुरुवात धमाकेदार केली आहे. त्याने चेंडू सीमारेषेपार टोलवत वनडे क्रिकेटमध्ये एका विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात त्याने वनडेत 9500 धावांचा टप्पा पार केला आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक श्रीलंकेने जिंकली. श्रीलंकेने फलंदाजीसाठी पूरक असलेल्या या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्टेडियमवर आतापर्यंत एकच सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दोन्ही संघांनी 300 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. यामुळे या सामन्यातही भारताला धावांचा रतीब घालण्याची आवश्यकता आहे. त्याचीच सुरूवात रोहित आणि शुबमन गिल यांनी केली. दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली असून संघाची धावसंख्या 150च्या जवळ नेली आहे. गिल 60 चेंडूत 70 धावा करत बाद झाला.
रोहितने 41 चेंडूतच चौकार मारत वनडे कारकिर्दीतील 47वे अर्धशतक पूर्ण केले. त्याने बांगलादेश दौऱ्याचा फॉर्म कायम राखला आहे. त्याने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने गमावला असला तरी रोहितचा फॉर्म जमेची बाजू ठरला. तशीच तुफानी खेळी आता त्याने घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध केली आहे. त्याने आतापर्यंत 236 वनडे सामने खेळले असून त्यामध्ये 9526* धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 29 शतके आणि 3 द्विशतके केली आहेत.
या मालिकेआधी भारत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळला. त्यामध्ये विराट कोहली, रोहित, केएल राहुल, मोहम्मद शमी यांना विश्रांंती दिली होती. आता त्यांनी वनडे मालिकेसाठी ते संघात परतले आहेत.
(INDvSL 1st ODI Rohit Sharma completed 9500 runs in ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी तयार आहे पण…’, भारताचे कर्णधारपद न मिळाल्यावर अश्विन बोलला मनातले
द्विशतकही नाही आलं कामी! गुवाहाटी वनडेत रोहितने ईशानला बसवले बाकावर