भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)यांच्यात मालिकेतील पहिला वनडे (मगंळवारी,10 जानेवारी) सामना खेळला जात आहे. गुवाहाटीच्या बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी नाणेफेक झाली आहे. यामध्ये श्रीलंकेने बाजी मारत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका पदार्पण करत आहे. तर भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे सलामीला येणार आहेत.
भारताच्या अंतिम अकरामध्ये विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) यांना जागा दिली असून ते संघपुनरागमन करत आहेत. तसेच श्रेयस अय्यर याला संधी देण्यात आल्याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला बाकावर बसावे लागले आहे. ईशान किशन यालाही संघात जागा मिळाली नाही.
गुवाहाटीत आतापर्यंत एकच वनडे सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली होती. वेस्ट इंडिज विरुद्धचा तो सामना भारताने 8 विकेट्स राखत जिंकला होता. तसेच या मैदानावर तीन आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले. ज्यामध्ये नाणेफेक जिंकणारे संघ विजेते ठरले होते. यामुळे या सामन्यासाठी नाणेफेक महत्वाची होती. तसेच थंडीचे दिवस असल्याने रात्री दव असल्याने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होतो.
खेळपट्टीचा रिपोर्ट पाहता भारताला मोठी धावसंख्या उभारण्यावर लक्ष असणार आहे. त्याचबरोबर वनडे विश्वचषक 2023ची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे, यामुळेही भारताची सुरूवात चांगली करण्याचा प्रयत्न असणार आहे.
या यामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन-
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.
Sri Lanka have won the toss and elect to bowl first in the 1st ODI.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/262rcUdafb #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/nd2D6s0rJm
— BCCI (@BCCI) January 10, 2023
श्रीलंका- पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चरिथ असालंका, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, दिलशान मदुशंका.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉचे झंझावाती शतक, वादळी खेळी करत बीसीसीआयच्या निवड समितीला फटकारले!
विराटची नजर सचिनच्या ‘त्या’ वर्ल्ड रेकॉर्डवर, श्रीलंकेविरुद्ध करणार का कमाल?