भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)पहिला टी20 सामना 3 जानेवारीला मुंबईमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारताने निसटता असा 2 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजी करायला सांगितली आणि यजमानांनी पहिल्या तीन विकेट्स 46 धावसंख्येवरच गमावल्या होत्या. अशा कठीण परिस्थितीतून दीपक हुडा याने संघाला बाहेर काढले. त्याने विलक्षण खेळी केली यामुळे तो सामनावीर ठरला. तेव्हा त्याने भारताने 10-12 धावा अधिक करायला पाहिजे होत्या असे मत व्यक्त केले.
सामन्यानंतर दीपक हुडा (Deepak Hooda) म्हणाला, “विकेट लवकर पडल्या यामुळे आता चांगली भागीदारी करायची हा विचार माझ्या डोक्यात होता. जेव्हा तुम्ही सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करता तेव्हा कठीण स्थितीसाठी तयार राहावे लागते. कारण विकेट्स या लवकरही पडू शकतात.”
हुडा पुढे म्हणाला,” मला नाही वाटत आम्ही लवकर विकेट्स गमावल्या, कारण आम्ही धावा करत होतो. या सामन्यात आम्ही एक किंवा दोन विकेट्स लवकर गमावल्या, मात्र जेव्हा एखादा फलंदाज सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो तेव्हा त्याची जबाबदारी असते धावा करण्याची, मग तो तुमचा पहिला सामना असो वा दुसरा.”
“धावा कमी झाल्या अशी चर्चा आम्ही केली नाही, मात्र माझ्या मते आणखी 10 ते 12 धावा अधिक बवनायला पाहिजे होत्या,” असेही हुडाने पुढे म्हटले.
या सामन्यात हुडाने 178.26च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. यामध्ये त्याने एक चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचबरोबर त्याने अक्षर पटेल याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत नाबाद 68 धावांची भागीदारी केली. यामुळे भारताने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 162 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सर्व विकेट्स गमावत 160 धावाच करू शकला.
Deepak Hooda is adjudged Player of the Match for his fine innings of 41* off 23 deliveries as #TeamIndia win by 2 runs.
Scorecard – https://t.co/uth38CaxaP #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/0LYRcUFtnC
— BCCI (@BCCI) January 3, 2023
हुडाच्या फलंदाजी क्रमाबाबत पाहिले तर, तो टी20 असो वा वनडे तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. भारताकडून वनडेमध्ये त्याने सर्वाधिक असे 5, 6 आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
(INDvSL 1st T20 Player of the match Deepak Hooda expressed regret said we scored 10 to 12 run less)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतबाबत मोठी अपडेट! स्टार विकेटकीपरवर पुढील उपचार मुंबईमध्ये होणार
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन