भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. यातील पहिला मंगळवारी (3 जानेवारी) मुंबईमध्ये खेळण्यात आला. जो सामना अवघ्या 2 धावांनी जिकंला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात हार्दिकला गोलंदाजीत हवी तशी कामगिरी करता नाही आली, मात्र त्याने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने सुरूवात केली. त्याने सामन्यातील पहिले षटक टाकले, ज्यामध्ये त्याने केवळ तीन धावा दिल्या. हार्दिक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिले षटक टाकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्याआधी भारताच्या आणखी काही कर्णधारांनी सामन्यातील पहिले षटक टाकले आहे, मात्र त्यांनी हे वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये केले आहे. त्यामध्ये कपिल देव, लाला अमरनाथ, अनिल कुंबळे आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा समावेश आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने 3 षटकात 12 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही, मात्र त्याने हा खास विक्रम केला. तसेच त्याने फलंदाजी करताना 27 चेंडूत 29 धावा केल्या होत्या.
हार्दिकचे नेतृत्व पाहून तो लवकरच कर्णधारपदाच्या ढाच्यात बसला आहे. त्याच्या नेतृत्व कौशल्याचा उत्तम नमुना श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिसला. त्याने आतापर्यंत 6 टी20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यातील 5 सामने भारताने जिंकले आहे. मुंबईच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावत 162 धावा केल्या होत्या. यामध्ये दीपक हुडा याने सर्वाधिक अशा नाबाद 41 धावा केल्या. त्याने ही खेळी 23 चेंडूत एक चौकार आणि 4 षटकार मारत केली. त्याचबरोबर त्याने अक्षर पटेल याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी नाबाद 68 धावांची भागीदारीही केली. अक्षर 20 चेंडूत 31 धावा करत नाबाद राहिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुणा संघ 160 धावसंख्येपर्यंतच पोहचू शकला. त्याचे कारण हार्दिकचा निर्णय ठरला. त्याने शेवटचे षटक अक्षर पटेल (Axar Patel) याला टाकण्यास सांगितले. त्याने प्रभावी गोलंदाजी करत 10 धावा दिल्या. या मालिकेतील दुसरा सामना पुणे येथे 5 जानेवारीला खेळला जाणार आहे.
(Hardik Pandya became the first Indian captain to bowl the first over in T20 International, INDvSL T20)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUSvSA: सामन्यादरम्यान मार्नस लॅब्यूशेनचा सिगारेट पिण्याचा इशारा! कारण चकित करणारे, व्हिडिओ व्हायरल
‘मी या संघाला संकटात…’, शेवटचे षटक अक्षरला देण्यामागचे कारण हार्दिकने केले स्पष्ट