भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL)यांच्यात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी (15 जानेवारी) खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. त्यामुळे यजमान संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 असा अजिंक्य आघाडीवर आहे. तिसरा सामना तिरुअनंतमुरम येथे खेळला जात असून या सामन्यासाठीची नाणेफेक झाली. भारताने नाणेफेक जिंकली आहे. दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल झाले आहेत.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेकीवेळी उमरान मलिक आणि हार्दिक पंड्या यांना विश्रांती दिली आहे असे सांगितले, तर त्यांच्याजागी सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना अंतिम अकरामध्ये निवडण्यात आले आहे. श्रीलंकेच्या संघातही अशेन बंदारा आणि जेफ्री वांडर्से यांना तिसरा वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे धनंजया डी सिल्व्हा आणि दुनिथ वेलालगे यांना बाकावर बसावे लागले आहे.
भारताने या मालिकेतील गुवाहाटी येथे झालेला पहिला सामना 67 धावांनी जिंकला होता. त्यामध्ये विराट कोहलीने शतकी, रोहित आणि शुबमन गिल यांनी अर्धशतकी खेळी केली होती. त्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका यानेही नाबाद शतकी खेळी केली होती, मात्र त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही आणि त्यांनी सामना गमावला. दुसरा सामनाही श्रीलंका जिंकण्याच्या जवळ होती, मात्र केएल राहुल याच्या चिवट खेळीमुळे भारत 4 विकेट्सने जिंकला होता. राहुलने 103 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या होत्या.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
#TeamIndia Captain @ImRo45 wins the toss and elects to bat first against Sri Lanka in the third and final ODI.
Washington Sundar and Suryakumar Yadav come in to the XI.
Live – https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/4TNIPSezrI
— BCCI (@BCCI) January 15, 2023
श्रीलंका- अविष्का फर्नांडो, नुवानिदू फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अशेन बंदारा, चरिथ असलंका, दसुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, जेफ्री वांडर्से, चमिका करुणारत्ने, कसून रजिथा, लाहिरू कुमारा.
3RD ODI. Sri Lanka XI: D Shanaka (c), N Fernando, A Fernando, K Mendis (wk), C Asalanka, A Bandara, W Hasaranga, C Karunaratne, K Rajitha, J Vandersay, L Kumara. https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 15, 2023
याआधी झालेली श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका भारताने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली 2-1 अशी जिंकली. या वनडे मालिकेनंतर भारत घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोर्डाच्या परिक्षेमुळे मुकणार होती टीम इंडियात एंट्री; आता वर्ल्ड कपमध्ये कुटल्या 161च्या स्ट्राईट रेटने धावा
‘ते अंपायरचे काम आहे खेळाडू आऊट…’, रोहितच्या अपील मागे घेतल्याच्या निर्णयावर अश्विनची तीव्र नाराजी