---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा वर्ल्डरेकॉर्ड! ईशान-अर्शदीपमुळे टीम इंडियाच्या नावावर खास कामगिरी

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 3:27 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील शेवटचा टी२० सामना शनिवारी (३१ जानेवारी) तिरुअनंतपुरममध्ये खेळला गेला. यामध्ये भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. यामुळे भारताने पाच सामन्यांची ही मालिका ४-१ अशी जिंकली. त्याचबरोबर भारताने घरच्या मैदानावर टी२०मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. शेवटच्या सामन्यात भारताने एक विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये भारताच्या डावात ईशान किशनने पुन्हा एकदा अविश्वसनीय खेळी केली. यामध्ये त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने ४३ चेंडूत १०३ धावा केल्या. सूर्यकुमारने नाबाद ६३ धावा (३० चेंडू) आणि हार्दिकने १७ चेंडूत ४२ धावा केल्या. ज्यामुळे भारत २० षटकात ५ विकेट्स गमावत २७१ धावसंख्या उभारू शकला.

यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने पहिली विकेट लवकर गमावली. त्यानंतर मात्र फिन ऍलनचा धमाका सुरू झाला. त्याने ३८ चेंडूत ८० धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी सुरूवातीला मार खाल्ला मात्र नंतर उत्तम कामगिरी करत किवींना १९.४ षटकातच गुंडाळले. यामध्ये भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकात ५१ धावा देत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये एकाच सामन्यात वैयक्तिक शतकी खेळी आणि पाच पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी भारताने आतापर्यंत चौथ्यांदा केली, जो एक विश्वविक्रमच ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये एकाच संघातील खेळाडूंनी एकाच डावात शतक आणि ५पेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी एकूण १३ वेळा झाली असून सर्वाधिक वेळा ही कामगिरी करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे.

टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १००+ धावांची वैयक्तिक खेळी आणि ५+ विकेट्सची भारताची कामगिरी-

केएल राहुल (१०१) आणि कुलदीप (५/२४) विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर २०१८
विराट कोहली (१२२) आणि भुवनेश्वर (५/४) विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई २०२२
सूर्यकुमार यादव (१००) आणि कुलदीप (५/१७) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग २०२३
ईशान किशन (१०३) आणि अर्शदीप (५/५१) विरुद्ध न्यूझीलंड, तिरुवनंतपुरम २०२६

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---