---Advertisement---

काय सांगता! इंदौरमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड भारी, किंग कोहलीचे तर अर्धशतकही…

On: शुक्रवार, जानेवारी 16, 2026 6:55 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि मालिका निर्णायक वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळला जाणार आहे. इंदौरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघामध्ये विजयासाठी चुरस दिसायला मिळणार आहे. दुसरा सामना गमावल्याने भारताचे चाहते चांगलेच निराश असून अजून एक काळजीत टाकणारी बाब पुढे येत आहे. ती म्हणजे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याची इंदौरमधील आकडेवारी. फॉर्ममध्ये असणाऱ्या विराटची इंदौरमधील वनडे प्रकारातील आकडेवारी चिंताजनक आहे.

विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यात सामनाविजयी ९३ धावा केल्या होत्या. त्याचा फायदा असा की त्याने आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले. ऑस्ट्रेलियामध्ये लागोपाठ दोन वनडे सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याने पुढील ५ सामन्यांत धावांचा पाऊस पाडला.

आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या विराटची इंदौरमधील आकडेवारी पाहिली तर धक्काच बसेल. त्याने या ठिकाणी आतापर्यंत ४ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने सरासरी अवघी ३३ एवढीच असून त्याने १०८.७९च्या स्ट्राईक रेटने केवळ ९९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३६ होती.

इंदौरमध्ये विराटने २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद २३ धावा, २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १२ धावा, २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २८ धावा आणि न्यूझीलंडविरुद्ध जानेवारी २०२३मध्ये नाबाद ३६ धावा केल्या आहेत. विशेष हे सर्व सामने भारताने जिंकले मात्र त्यांची एकही खेळी सामनाविजयी नव्हती. तसेच तो या स्टेडियमध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत १३व्या क्रमाकावर आहे.

दुसरीकडे इंदौरमधील भारताची कामगिरी पाहिली तर अविश्वसनीय आहे. होळकर स्टेडियमवर भारताने आतापर्यंत सात सामने खेळले असून या सातही सामन्यांत विजय मिळवलेला आहे. भारत मैदानावर शेवटी न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता. जानेवारी २०२३मध्ये झालेल्या त्या सामन्यात भारताने ९० धावांनी विजय मिळवला होता. यामध्ये रोहित-शुबमन गिल यांनी शतके केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---