---Advertisement---

INDvsNZ: श्री पद्यनाभस्वामी मंदिरात रिंकू-सूर्यामध्ये नक्की काय झाले, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 3:21 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाचवा आणि मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) खेळला जाणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यासाठी खेळाडू तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाले आहेत. यातील काही भारतीय खेळाडूंनी प्रसिद्ध श्री. पद्यनाभस्वामी मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. त्यांचा मंदिरातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती आणि स्फोटक फलंदाज रिंकू सिंग दिसत आहेत. त्याचबरोबर कुलदीप यादव, रवि बिश्नोई आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप हे पण मंदिरात दर्शनासाठी पोहोचले.

यामध्ये मंदिरातील अधिकाऱ्यांसोबत फोटो काढताना रिंकू सिंग मागे राहिल्याचे दिसताच सूर्यकुमारने त्याला हात धरून पुढे आणले. रिंकू यामध्ये फोटो काढण्यापासून बचाव करताना दिसत आहे.

श्री. पद्यनाभस्वामी मंदिर खूप जुने असून ते इसवी. ५व्या शतकात बनल्याचे काही सांगतात. या मंदिराच्या काही तिजोऱ्या उघडल्या गेल्या ज्यामध्ये कोटींची संपत्ति असल्याचे समोर आहे.

चौथ्या सामन्यातील पराभवानंतर भारत या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनचे हे होमग्राऊंड आहे. सध्या तो मालिकेत साजेशी खेळी करू शकला नाही. यामुळे फलंदाजीत त्याची लय परतावी तसेच संघाच्या विजयाची अपेक्षा आहे.

तसेच संजू हा त्याच्या घरच्या मैदानावर भारतासाठी पहिल्यांदाच टी२० सामना खेळणार आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ५६ टी२० सामने खेळले आहेत.

पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारताने आधीच पहिले तिन्ही सामने जिंकत विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेचे समीकरण ३-१ असे आहे. भारताने चौथा सामना ५० धावांनी गमावला होता. त्यामध्ये शिवम दुबेची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली होती. त्याने या सामन्यात १५ चेंडूतच ५० धावा पूर्ण केल्या होत्या. यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला. यामध्ये युवराज सिंग (१२ चेंडू) आणि अभिषेक शर्मा (१४ चेंडू) यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---