भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) खेळला जात आहे. उभय संघांतील ही लढत अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे. जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने अर्धशतक केले आणि मोहम्मद सिराज याच्या चेंडूवर तो बाद झाला.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तनसाने बाबर आझम () याच्या रुपात सामन्यातील तिसरी विकेट गमावली. बाबरने 58 चेंडूत 50 धावांची खेली केली. वनडे क्रिकेटमधील बाबरचे हे भारताविरुद्ध पहिलेच अर्धशतक ठरले. बाबर खेळपट्टीवर सेट झाल्याचे वाटत असतानाच मोहम्मद सिराज याने त्याचा त्रिफळा उडवला. पाकिस्तानच्या डावातील 30व्या षटकाती भारताला हे यश मिळाले.
Mohammed Siraj at his very best!
The whole crowd chanting ‘Siraj, Siraj’. pic.twitter.com/sYeFiPNiHE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
(INDvsPAK MOHAMMED SIRAJ Cleans up Babar Azam for 50)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
माजी क्रिकेटपटूला मिळणार 91 कोटींची भरपाई, ‘टॉप गीअर’ शूटदरम्यान घडला होता भीषण अपघात
रोहितचा पाकिस्तानविरुद्ध अनोखा विक्रम! विश्वचषकात बदलून टाकला भारताचा इतिहास, काय केलंय वाचाच






