---Advertisement---

सिक्स असा मारा की, काच तुटली पाहिजे! रिंकू सिंगच्या षटकाराने केले मीडिया बॉक्सचे नुकसान, व्हिडिओ पाहाच

On: बुधवार, डिसेंबर 13, 2023 10:50 AM
Rinku-Singh-Six
---Advertisement---

Rinku Singh Six Broke The Glass: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात रिंकू सिंग चांगलाच चमकला. रिंकून त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले. रिंकूने त्याच्या डावाची सुरुवात चौकाराने केली होती. पॉवरप्लेमध्येच भारताने 3 विकेट्स गमावल्या होत्या. अशात सहाव्या षटकात फलंदाजीला आलेल्या रिंकूने कौतुकास्पद खेळी केली.

रिंकू सिंग (Rinku Singh) याने 30 चेंडूत अर्धशतक साजरे केले. तसेच, एडेन मार्करम टाकत असलेल्या 19व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर सलग 2 गगनचुंबी षटकार मारले. यातील एक षटकार मीडिया बॉक्सच्या दिशेने गेला, त्यामुळे रिंकू सिंगच्या षटकाराने मीडिया बॉक्सची काच (Rinku Singh’s six) फुटली. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सामन्याचा आढावा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. यामुळे सामना 20व्या षटकात थांबवावा लागला. यापूर्वी मालिकेतील पहिला टी20 सामनाही पावसामुळे रद्द करण्याता आला होता. दुसऱ्या टी20त रिंकू सिंग (68) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (56) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी 48 चेंडूत 70 धावांची भागीदारी झाली. या जोरावर भारताने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 19.3 षटकात 7 विकेट्स गमावत 180 धावा केल्या.

रिंकूच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने यावेळी 39 चेंडूत 174.36च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक नाबाद 68 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.

भारताच्या डावातील अखेरच्या षटकात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताचा डाव इथेच संपला. यावेळी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 152 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान त्यांनी 13.5 षटकात पार केले. त्यांच्याकडून सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (49) याने सर्वाधिक धावा केल्या. तसेच, कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markram) यांनेही 30 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. इतर एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. मात्र, अँडिले फेहलुक्वायोने 14व्या षटकातील 5व्या चेंडूवर षटकार मारत संघाला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. (INDvsSA 2nd T20 rinku singh six broke the glass of the media box hits maiden t20i fifty in gqeberha)

हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेत झाला ‘सूर्या’उदय! धोनीलाही न जमलेली कामगिरी सूर्याने करून दाखवली, कौतुकच कराल
INDvsSA T20: सूर्याला माहितीये, संघाकडून कुठे झाली चूक? पराभवानंतर मोठे विधान करत म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---