सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. भारत श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका सामना बरोबरीत सुटला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं बाजी मारली आणि 32 धावांनी भारताचा पराभव केला. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाला 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्धची मालिका गमावायची नसेल, तर बुधवारी कोलंबो येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात त्यांना फिरकीपटूंवर वर्चस्व राखावं लागणार आहे.
भारताचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे आणि त्याला पराभवाची सुरुवात नक्कीच करायची नसेल. 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला शेवटचा पराभव पत्करावा लागला होता, जेव्हा अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघानं सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) भारतीय संघाचा तिन्ही सामन्यांमध्ये पराभव केला होता.
1997 पासून भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 11 एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. त्यामध्ये सर्व मालिकांमध्ये भारतीय संघ विजयी झाला आहे. परंतू भारताला सध्याची मालिका जिंकता येणार नाही कारण पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. आता मालिकेत बरोबरी करण्यावर भारताचं लक्ष असणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी (7 ऑगस्ट) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबो मैदानावर खेळला जाणार आहे. पहिल्या 2 सामन्यात भारतीय फलंदाजांनी चाहत्यांना निराश केलं. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावलं. रोहित आऊट झाल्यानंतर भारतीय संघाचा फलंदाजी क्रम डगमगताना दिसून आला. त्यामुळे भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मालिका गमवायची नसेल तर सामना जिंकावा लागणार आहे. त्यासाठी भारतीय संघात बदल देखील पाहायला मिळू शकतात.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
श्रीलंका: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका(कर्णधार), जेनिथ लियानागे, दुनिथ वेलालागे, कामिंदू मेंडिस, अकिला धनाजया, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, निशान मदुशंका, महीश थीक्ष्णा, ईशान मलिंगा, मोहम्मद शिराझ
महत्त्वाच्या बातम्या-
“निशा दहियावर अन्याय, तिला जाणूनबुजून दुखापतग्रस्त…”, प्रशिक्षकांचा विरोधी संघावर मोठा आरोप
हवेलीत मेगा मॅरेथॉनचे आयोजन, 700 पेक्षा शालेय धावपटूंचा सहभाग
आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 20 धावा केलेला खेळाडू बनला दक्षिण आफ्रिकेचा नवा फलंदाजी प्रशिक्षक