भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील दुसरा टी-20 सामना रविवारी (7 जानेवारी) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयोजित केला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवला. टी-20 मालिकेतील हा ऑस्ट्रेलिया पहिला विजय असून मालिका 1-1 असा बरोबरीवर पोहोचली. किम गार्थ हिला या सामन्यात सामनावीर पुरस्कार दिला गेला.
किम गार्थ (Kim Garth) हिने या मालिकेतील सामन्यात 4 षटकात 27 धावा खर्च करून शफाली वर्मा (1) आणि जेमिमा राॅड्रिग्स (13) यांना बाद केले. या महत्वपूर्ण विकेट्स घेण्यासाठी तिला सामनावीर पुरस्कार दिला गेला. भारतासाठीही या सुरुवातीच्या दोन विकेट्स अडचणीत टाकणाऱ्या ठरल्या. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 विकेट्सच्या नुकसानावर 20 षटकात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य 19 षटकांमध्ये आणि 4 विकेट्सच्या नुकसानावर गाठले.
सामनावीर ठरल्यानंतर काय म्हणाली किम गार्थ?
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतला मात दिल्यानंतर किम गार्थ म्हणाली, “मी या प्रदर्शनामुळे खुश आहे. सामनावीर पुरस्कार मला मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. कारण एनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेरहम यांनी चांगली गोलंदाजी केली होती. मला हवा आमि सीम या दोन्ही गोष्टींमुळे मूवमेंट मिळाली. चेंडू स्टंप्सवर टाकण्याचा प्रयत्न मी केला. गोलंदाजी चांगली झाली, यासाठी मी स्वतःला नशीबवान मानतो. भारतात गोलंदाजी करताना नेहमीच चांगला अनुभव येतो. स्टेडियमची सीमारेषा जवळ आहे. पण माझे प्रदर्शन सुधारण्यासाठी मी प्रयत्न करत होते.”
दरम्यान, उभय संघातील या सामन्यात दोन्ही संघांपैकी एकही फलंदाज अर्धशतक करू शकली नाही. भारतासाठी दीप्ती शर्मा हिने सर्वाधिक 30, तर ऑस्ट्रेलियासाठी एलिस पेरी हिने सर्वादिक 34 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी किम गार्थव्यतिरिक्त एनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वरेहम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. दुसरीकडे भारतासाठी दीप्ती शर्मा हिने गोलंदाजी विभागात देखील सर्वोत्तम प्रदर्शन केले. दीप्तीने 4 षटकात 22 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. (Kim Garth’s reaction after being Man of the Match)
महत्वाच्या बातम्या –
केपटाऊन कसोटीवर दिग्गजाने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘त्यांनी केली ती चूक आणि आम्ही…’
पाकिस्तानला मिळालं नवं नेतृत्व! न्यूझीलंड दौऱ्यात ‘या’ खेळाडूच्या हातात संघाची धुरा