ऑस्ट्रेलियन महिला संघ भारत दौऱ्यावर असून मंगळवारी (2 जानेवारी) त्यांचे जबरदस्त प्रदर्शन पुन्हा एकदा पाहायला मिळाले. भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज फिबी लिचफिल्ड हिने सलग तिसऱ्या सामन्यात सुरेख खेळी केली आणि आपले दुसरे वनडे शतक साकारले.
ऑस्ट्रेलियासाठी सलामी फलंदाज फिबी लिचफिल्ड (Phoebe Litchfield) आणि एलिसा हिली यांनी या सामन्यात मोठी भागीदारी केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली आणि संघाला एक चांगली सुरुवात मिळवून दिली. यात फिबी लिचफिल्ड हिने 125 चेंडूंमध्ये 119 धावांचे योगदान दिले. तिने 109 चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले. तसेच कर्णधार एलिसा हिली हिनेही 85 चेंडूत 82 धावांचे योगदान दिले. फिबीने डावातील 40व्या षटकात दीप्ती शर्माच्या चेंडूवर हरमनप्रीत कौर हिच्या हाता झेली दिला आणि विकेट गमावली. तत्पूर्वी पूजा वस्त्राकरने डावातील 29व्या षटकात एलिसा हिलीचा त्रिफला उडवत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
एकंदरीत पाहता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणारा ऑस्ट्रेलिया संघ सध्या भक्कम स्थितीत दिसत आहे. अवघ्या 39 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 250 धावांचा टप्पा पार केला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना विकेट न गमावता धावा कराव्या लागतील. (Phoebe Litchfield scores second ODI century at Wankhede! )
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, मन्नत कश्यप, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, श्रेकायन पाटील.
ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (यष्टीरक्षक आणि कर्णधार), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मुनी, ताहलिया मॅकग्रा, ऍशले गार्डनर, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शुट.
महत्वाच्या बातम्या –
वादात सापडलेल्या उस्मान ख्वाजाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला, ‘जेव्हा मी निरपराध मुलांना…’
IND vs SA: टीम इंडियाच्या इज्जतीचा प्रश्न; दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माला ‘हा’ निर्णय घेणे पडू शकते भाग