भारतीय महिला संघाने इंग्लंड दौरा चांगलाच गाजवला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने संघाने आधीच जिंकले असून मालिकेत 0-2 अशी आघाडी घेतली होती. शनिवारी संघ यजमान इंग्लंडला पराभूत करून क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात दिसला. प्रथम फलंदाजी करताना संघाने खूपच सुमार प्रदर्शन केले. परंतु नंतर जबरदस्त गोलंदाजी केली. इंग्लंडने अखेरच्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली होती. पण नॉन स्ट्राइकवरील फलंदाज धावबाद करत भारताने सामना नावे केला. यासह भारतीय संघाने दिग्गज वेगवान गोलंदाज व माजी कर्णधार झूलन गोस्वामीला विजयी निरोप दिला. 16 धावांच्या अंतराने भारतीय संघ या सामन्याच जिंकला.
A run out at the non-striker's end and India win! 🙌🏻#ENGvIND | #IWC | Scorecard: https://t.co/PAduT7xxtc pic.twitter.com/2hKYUjb0YR
— ICC (@ICC) September 24, 2022
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर गोलंदाजांचे पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळाले. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय संघ 50 षटके देखील पूर्ण करू शकला नाही. भारताने सर्व विकेट्स 45.4 षटकात 169 धावा करून गमावल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड 43.3 षटकांमध्ये सर्वबाद झाला. झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता आणि संघाने यामध्ये विजय देखील मिळवला.
भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर सलामीवीर स्मृती मंधानाने अर्धशतकीय खेळी करत चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. स्मृतीने 79 चेंडूत 50 धावा केल्या. तसेच मध्यक्रमात अष्टपैलू दीप्ती शर्माने देखील 68 धावांची महत्वाची खेळी खेळी केली. त्याव्यतिरिक्त पूजा वस्त्राकारच्या 22 धावा सोडल्या तर भारताची एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकली नही. इंग्लंडसाठी केट क्रॉसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण त्यांना ते गाठता आले नाही. त्यांच्या चार्ली डीन हिने 47 धावांची सर्वात मोठी खेळी केली. यष्टीरक्षक फलंदाज एमी जॉन्सने 28, तर एमा लॅम्बने 21 धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजी आक्रमाचा विचार केला, तर रेणुका सिंगने सर्वात जास्त सर्वाधिक 4 बळी घेतले. कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणाऱ्या झुलन गोस्वामीने आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. या विजयानंतर बारताने यजमान इंग्लंडला क्लीन स्वीप दिला.
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेरच्या सामन्यात झूलनला इंग्लंडचा ‘गार्ड ऑफ ऑनर’! पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
‘मी विजयाचे श्रेय घेत नाही…’, सामना जिंकल्यानंतर कार्तिकने रोहितचेच केले कौतुक
एमएस धोनीची पोस्ट व्हायरल! करणार मोठी घोषणा; नेमके कुठे, घ्या जाणून