दक्षिण आफ्रिका महिलांचा भारत (South Africa Tour India) दौरा सुरु आहे. पहिल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने मात दिली. परंतू आज शुक्रवार (28 जून) रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकच कसोटी सामना खेळला जात आहे. चेन्नईमधील चेपाॅक स्टेडियमवर हा सामना रंगला आहे. या सामन्यात भारताची सलामीवीर शफाली वर्मानं (Shafali Verma) द्विशतक ठोकून इतिहास रचला आहे.
शफाली वर्मानं या सामन्यात (Shafali Verma) 197 चेंडूत 205 धावा ठोकल्या. त्यामध्ये तिनं 8 षटकार आणि 23 लगावले. यादरम्यानं तिचा स्ट्राईक रेट 104.06 राहिला. शफाली वर्मा महिला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीनं द्विशतक ठोकणारी जगातील पहिला महिला ठरली. तर भारतासाठी मिताली राजनंतर द्विशतक ठोकणारी दुसरी भारतीय महिला ठरली.
महिला आंतरराष्ट्रीय कसोटीत सर्वात वेगवान द्विशतक
194 चेंडू – शफाली वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2024
256 चेंडू – ॲनाबेल सदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2024
313 चेंडू – कॅरेन रोल्टन विरुद्ध इंग्लंड, 2001
345 चेंडू – मिशेल गोस्को विरुद्ध इंग्लंड, 2001
374 चेंडू – एलिस पेरी विरुद्ध इंग्लंड, 2017
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या पराभवानंतर माजी कर्णधारचा गंभीर अरोप, हरभजन सिंगने दिले सडेतोड उत्तर
भारत-दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये कोणाचं वर्चस्व? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
2 वर्षांपूर्वी जेव्हा भारत इंग्लंडकडून हरला, दिनेश कार्तिकने सांगितली पराभावनंतरची कटू व्यथा