आयपीएल २०२२ स्पर्धेला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. याच स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा ऑक्शन पार पडले. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक खेळाडू कोट्यवधी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर अनुभवी खेळाडूंना खाली हात परतावे लागले आहे. असेच काहीसे अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत देखील घडले आहे. यावेळी फ्रँचायजिंनी अनुभवी अष्टपैलू खेळाडूंवर नव्हे तर ताज्या दमाच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
आयपीएल २०२२ स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक अनुभवी अष्टपैलू खेळाडूंना खाली हात परतावे लागले आहे. तर नवख्या खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांची बोली लागली आहे.
या अष्टपैलू खेळाडूंवर लागली कोट्यावधींची बोली
कॅरेबियन संघाचा अष्टपैलू खेळाडू डॉमिनिक ड्रेक्सला गुजरात टायटन्स संघाने १ कोटी ७५ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. तर भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू जयंत यादवला देखील गुजरात टायटन्स संघाने १ कोटी ७० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे. तसेच विजय शंकरवर देखील गुजरात टायटन्स संघाने १ कोटी ४० लाखांची बोली लावली. यासह चेन्नई सुपर किंग्जने शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्जने ४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.
ताज्या दमाच्या खेळाडूंवर कोटींची बोली
डॉमिनिक ड्रेक्स – गुजरात टायटन्स – ७५ लाख
जयंत यादव – १ कोटी ७० लाख – गुजरात टायटन्स
विजय शंकर – १ कोटी ४० लाख. – गुजरात टायटन्स
शिवम दुबे – ४ कोटी रुपये – चेन्नई सुपर किंग्ज
अनुभवी अष्टपैलू खेळाडू परतले रिकाम्या हाती
एकीकडे ताज्या दमाच्या खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागत असताना, अनुभवी अष्टपैलू खेळाडू अनसोल्ड राहिले आहे. बांगलादेश संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन, ख्रिस जॉर्डन, सौरभ तिवारी आणि जिमी निशम सारखे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
एडन मार्करमचा लिलावातही पराक्रम! हैद्राबादने विश्वास दाखवत लगावली भली मोठी बोली
मंकडींग आऊट झालेल्या बटलरकडूनच अश्विनचं राजस्थानमध्ये स्वागत, म्हणाला, ‘काळजी नको, मी क्रिजमध्येच
चाहरला लिलावात मूळ किंमतीच्या ७ पट रक्कम, बहिण आणि होणाऱ्या पत्नीने दिली अशी रिऍक्शन