fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेवेळी मैदानावर बसून ढसाढसा रडणारा क्रिकेटर, ज्याने १९व्या वर्षीच मुंबईत मिळवली जागा

Information About Mumbai Indians Faster Bowler Mohsin Khan

September 18, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

क्रिकेटजगतात अनेकदा अनोख्या गोष्टी घडताना आपण पाहिले आहे. मग अगदी देशांतर्गत क्रिकेटपासून ते जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळाडू विचित्र गोष्टी करताना दिसतात. एखादी विकेट घेतली तर ड्वेन ब्रावोचा मैदानावर पाहायला मिळणारा डान्स, सीपीएलच्या गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाचा गोलंदाज रोमारियो शेफर्डचे विकेट घेतल्यानंतर कोलंटीउडी घेणे, ही याची काही उदाहरणे आहेत.

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्येही असाच एक खेळाडू आहे, जो मैदानावर रडत बसायचा. हा खेळाडू म्हणजे, उत्तर प्रदेशच्या मुरदाबादमधील मध्यवर्गीय कुटुंबात जन्मलेला ‘मोहसिन खान’. मोहसिनचे वडील उत्तर प्रदेश पोलिसमध्ये उपनिरीक्षक आहेत. लहानपणीपासूनच क्रिकेटची आवड असणाऱ्या मोहसिनने खूप कमी वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

मोहसिनच्या ज्यूनियर क्रिकेटमधील प्रदर्शनामुळे त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत निवड झाली होती. परंतु, सराव करत असताना या युवा खेळाडूच्या खांद्याला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला आपला हात उचलायलाही त्रास होऊ लागला. आपल्या दुखापतीमुळे त्रस्त झालेला मोहसिन मैदानावर बसून रडत असायचा. पण रडून त्याची दुखापत बरी होणार नव्हती, त्यामुळे शेवटी मोहसिनने त्याच्या खांद्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्याला पुढे खूप फायदा झाला.

डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खांद्याच्या सर्जरीनंतर पुन्हा त्याच्या लयीत आला. त्याने २०१७-१८ सालच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ८ सामने खेळत १३ विकेट्स पटकावल्या. यासह तो पूर्ण हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टॉप-१०मध्ये होता. मोहसिनच्या या दमदार गोलंदाजी प्रदर्शनाने त्याच्या आयपीएल पदार्पणाची दारे खुली झाली.

२०१८सालच्या आयपीएल लिलावात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सने मोहसिनला २० लाख रुपयांना विकत घेतले. पण दमदार खेळाडूंचा भरणा असणाऱ्या मुंबई संघाकडून त्याला अद्याप एकही सामना खेळायला मिळाला नाही. असे असले तरी, मोहसिनच्या प्रतिभेला पाहता, त्याच्या आयपीएल पदार्पणाचा दिवस उजडायला जास्त दिवस लागणार नाहीत.

हा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज त्याच्या गोलंदाजीच्या लाइन व लेंथसह त्याच्या वेगासाठीही ओळखला जातो.  तो १४० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करु शकतो. मोहसिनने त्याच्या वेगवान गोलंदाजीने देशांतर्गत क्रिकेटमधील कित्येक फलंदाजांना रडकुंडीला आणले आहे. आजवर मोहसिनने फक्त एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे, त्यात त्याने २ विकेट्स चटकावल्या आहेत.

असे असले तरी, मोहसिनचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील प्रदर्शन उल्लेखनीय आहे. त्याने ११ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. त्यात त्याने १९ विकेट्स घेतल्या आहेत. तर, देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये त्याने २६ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली आहे. त्याचा टी२० क्रिकेटमधील इकोनॉमी रेट हा ७ इतका आहे आणि हीच गोष्ट त्याला खास बनवते. म्हणूनच मोहसिनला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हटले जाते.

या प्रतिभाशाली गोलंदाजाला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यावर्षी खेळण्याची संधी देईल का नाही?, हे पाहणे रोमांचक ठरेल. उद्यापासून (१९ सप्टेंबर) आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. तब्बल ५३ दिवस चालणाऱ्या या आयपीएल २०२०चा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली तलवार भेट

सीएसकेला चौथे विजेतेपद मिळवण्यात ‘ही’ गोष्ट ठरणार सर्वात मोठा आडथळा

राजस्थान संघ आहे संकटात, या खेळाडूने वाढवले टेन्शन

ट्रेंडिंग लेख –

‘भावी युवराज सिंग’ आहे पदार्पणाच्या प्रतिक्षेत, ५ सामन्यात ठोकल्यात ७५३ धावा

हे ५ खेळाडू आयपीएलमधून त्यांच्या कर्णधारापेक्षाही करणार अधिक कमाई

रोहित शर्माच्या कोचचा मुलगा ही त्याची पहिली ओळख


Previous Post

आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली तलवार भेट

Next Post

इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका

Related Posts

Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

इंजमामचे 'आलू प्रकरण' व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी कायम लक्षात राहिलेली वनडे मालिका

Photo Courtesy: Twitter/Mipaltan

रोहित-सचिन तर सर्वांनाच माहित आहे, परंतू हे ५ सितारेही झाले होते मुंबईचे कर्णधार

Photo Courtesy: Twitter/IPL

'हा' कर्णधार म्हणतोय, माझ्या संघामधील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कोणीही निराश नाही

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.