इंडियन प्रीमियर लीग 2023 संपल्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी करत आहे. डबल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात भारतासमोर आव्हान आहे बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे. भारतासाठी नक्कीच आयपीएलनंतर डब्ल्यूटीसी फायनल खेळणे सोपे नसेल. सोबतच यावर्षी डब्ल्यूटीसीचा हा अंतिम सामना ड्यूक बॉलने खेळला जाणार आहे, ज्याची भारतीय संघाला सवय नाहीये. असे असले तरी, अक्षर पटेल यांच्या मते भारतीय संघ या सामन्यासाठी तयार आहे.
अक्षर पटेल (Axar Patel) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सुरू असतानाच भारतीय खेळाडूंना डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी (WTC Final) ड्यूक चेंडूने सरावाला सुरूवात केली होती. सोबतच त्याने असेही सांगितले की, दोन महिने व्हाईट बॉल क्रिकेट खेळल्यानंतर लाल चेंडूने खेळणे सोपे नसते.
अक्षर पटेल म्हणाला, “आयपीएलदरम्यानही आपण लाल चेंडूने गोलंदाजी केली पाहिजे, अशी चर्चा झाली होती. आमच्याकडे लाल चेंडू होता देखील आणि आम्ही त्याचा वापरही केला. तुम्हा कधी, कसे खेळायचे आहे आणि तुमच्याकडे किती वेळ बाकी आहे, या गोष्टी तुम्हाला माहिती असतात. पांढऱ्या चेंडूवरून लाल चेंडूवर स्वीच करणे नक्कीच अवघड आहे. पण आमच्याकडे खूप वेळ आहे. फकर फक्त इतकाच आहे की, लाल चेंडूची चमक बराच काळ टिकून राहते. आयपीएलदरम्यान, या चेंडूवर सराव केल्यामुळे आम्हाला याची सवय झाली आहे.”
“मी म्हटल्याप्रमाणे आम्ही पांढऱ्या चेंडूवरून लाल चेंडूवर आलो आहोत. हे अगदी एसजी चेंडूवर ड्यूकवर येण्यासारखेच आहे. तुम्हाला आपल्या योजना अमलात आणाव्या लागतील. चेंडू कसाही असूद्या तुम्ही जर योग्य जागी योग्य पद्धतीने तो चेंडू फेकला, तर त्याचा नक्की परिणाम होतो. आमचा अगदी हाच प्रयत्न आहे. सामना इंग्लंडमध्ये असल्यामुळे परिस्थिती भारतापेक्षा वेगळी असणार आहे. अशात याठिकाणी कोणती लाईन-लेंथ कामी येईल, याची आम्ही योजना आखात आहोत. सराव सत्रातही यावर काम करत आहोत. सामना खेळण्यासाठी आम्ही तयार आहोत.” (Information received from Axar Patel that Indian players practiced for WTC finals during IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘आयपीएल 2023 नेहमी लक्षात राहील…’, पाकिस्तानी दिग्गजाने बदलले आपले सूर
”बाहेरच्या देशात जाऊन भारताचे नाव…” आकाश चोप्राची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका