पुणे। आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018- 19 स्पर्धेत इन्फोसीस, केपीआयटी, सिमेन्स व टीसीएस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
व्हिजन क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या उपांत्यपुर्व फेरीच्या सामन्यात आशय पालकरच्या दमदार 94 धावांच्या बळावर इन्फोसीस संघाने सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा 46 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना इन्फोसीस संघाने 20 षटकात 4 बाद 200 धावा केल्या. 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सॉफ्टहार्ड ऑटोमेशन संघाचा डाव 20 षटकात 6 बाद 154 धावांत अटोपला. 48 चेंडूत 94 धावा करणारा आशय पालकर सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत मयंक जासोरेच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर टीसीएस संघाने कॉग्निझंट संघाचा 50 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टीसीएस संघाने 20 षटकात 6 बाद 227 धावांचा डोंगर रचला. यात एकट्या मयंक जासोरेने केवळ 62 चेंडूत 145 धावा केल्या. 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कॉग्निझंट संघ 20 षटकात 6 बाद 177 धावांत गारद झाला. मयंक जासोरे सामनावीर ठरला.
अन्य लढतीत केपीआयटी संघाने सायबेज संघाचा 41 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सौरभ जळगावकरच्या 43 धावांसह सिमेन्स संघाने मर्क्स संघाचा 76 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपुर्व फेरी
इन्फोसीस- 20 षटकात 4 बाद 200 धावा(प्रभज्योत मल्होत्रा 26(17), संदिप शांघाई 36(31), आशय पालकर 94(48), अभिमन्यु ढमढेरे 2-48) वि.वि सॉफ्टहार्ड ऑटोमेशन- 20 षटकात 6 बाद 154 धावा(अमित कदम 44(26), प्रफुल मानकर नाबाद 71(52), रवी थापलियाल 2-27) सामनावीर- आशय पालकर
इन्फोसीस संघाने 46 धावांनी सामना जिंकला.
टीसीएस- 20 षटकात 6 बाद 227 धावा(मयंक जासोरे 145(62), गौरव सिंग नाबाद 21(10), प्रथमेश देशपांडे 2-31) वि.वि कॉग्निझंट- 20 षटकात 6 बाद 177 धावा(नितेश सप्रे 72(44), प्रथमेश देशपांडे नाबाद 49(45), निपुन शर्मा 20(9), गौरव सिंग 2-20, अभिनव कालिया 2-28) सामनावीर- मयंक जासोरे
टीसीएस संघाने 50 धावांनी सामना जिंकला.
केपीआयटी- 20 षटकात 6 बाद 144 धावा(कमलेश सुर्वे 31(25), भुरानउद्दीन भरमार नाबाद 38(22), सौरभ रावळ 3-12) वि.वि सायबेज- 18.1 षटकात सर्वबाद 103 धावा(संकेत एकल 20, अलोक नागराज 2-18, निरंजन फडणवीस 2-14, अंबर दांडगवल 2-12) सामनावीर- भुरानउद्दीन भरमार
केपीआयटी संघाने 41 धावांनी सामना जिंकला.
सिमेन्स- 20 षटकात 7 बाद 199 धावा(सौरभ जळगावकर 43(29), अतूल पवार 41(25), हिमांशू अगरवाल 58(36), प्रसाद गिरकर 2-23, व्यंकटेश अय्यर 2-34, योगेश मोटे 2-19) वि.वि मर्क्स- 20 षटकात 8 बाद 123 धावा(प्रसाद गिरकर 28, वैभव महाडीक 21, राकेश पिल्ले 22, दिपक कुमार 2-12, नमन शर्मा 2-25) सामनावीर- सौरभ जळगावकर
सिमेन्स संघाने 76 धावांनी सामना जिंकला.