---Advertisement---

भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला 440 वोल्टचा झटका! एकदाच 3 स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

Australia-Team
---Advertisement---

संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष सध्या आगामी टी20 विश्वचषक 2022 वर लागून आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात ही आयसीसी स्पर्धा खेळली जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. मात्र 20 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेपूर्वी पाहुण्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाचे 3 प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेतून बाहेर झाले आहेत. मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि मिशेल मार्श हे दुखापतीमुळे भारताविरुद्ध खेळू शकणार नाहीत. ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या पर्यायी खेळाडूंचीही घोषणा केली आहे. 

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैली स्टॉयनिस स्नायूंच्या ताणामुळे या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू मिशेल मार्श हेदेखील दुखापतग्रस्त आहेत. स्टार्कला गुडघ्याची दुखापत झाली आहे. तर मार्शच्या घोट्याला दुखापत झाली आहे. स्टॉयनिस आणि मार्श यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान या दुखापती झाल्या होत्या. तिघांच्याही दुखापती जास्त गंभीर नाहीत, तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी20 विश्वचषकापूर्वी कसलीही जोखीम न घेण्याच्या हेतूने त्यांना भारताविरुद्ध न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात आता या तिघांच्या जागी नाथन एलिस, डॅनियल सॅम्स आणि सिन ऍबॉट याला जागा देण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघासाठी एकदाच 3 खेळाडूंना दुखापती होणे हा मोठा झटका आहे. कारण भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अगोदरच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धाकड फलंदाज डेविड वॉर्नर यालाही विश्रांती दिली आहे. त्यामुळे एकदाच 4 प्रमुख खेळाडूंविना भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ दुबळा पडू शकतो. 15 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात येण्यासाठी उड्डाण भरू शकतो.

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अपडेटेड ऑस्ट्रेलिया संघ:
सिन ऍबॉट, ऍश्टन ऍगर, पॅट कमिन्स, टिम डेविड, नॅथन एलिस, ऍरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, ऍडम झम्पा.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…
टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघाने लॉन्च केली नवी जर्सी, पाहा त्यात काय आहे विशेष?
महाराष्ट्राची पोरगी इंग्लंडच्या पठ्ठ्यावर भारी! स्म्रीतीने बड्या विक्रमात जोस बटलरला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---