---Advertisement---

T20 WC26: दुखापतीमुळे ‘या’ संघाचा कर्णधारच झाला स्पर्धेबाहेर, एका टीममध्ये 20 वर्षाच्या अनकॅप्ड खेळाडूची वर्णी

On: शुक्रवार, फेब्रुवारी 13, 2026 1:11 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये संघांना लागोपाठ दुखापतीचे धक्के बसत आहे. आता आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेमधून बाहेर पडला आहे. त्याला ही दुखापत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली होती. त्याच्याजागी २० वर्षाच्या अनकॅप्ड खेळाडूचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वेचा कर्णधारही दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला आहे.

स्टर्लिंगला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅच पकडताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो फलंदाजीला देखील आला असता एकेरी धाव घेताना त्याची ती दुखापत आणखी चिघळली. हा सामना आयर्लंडने ६७ धावांनी गमावला. तसेच आयसीसीने स्टर्लिंगच्या बदली खेळाडूला मंजूरी दिली आहे. त्याच्याजागी सॅम टॉपिंग खेळणार असून तो लगेचच संघाशी जोडला जाणार आहे.

टॉपिंग हा डावखुरा फलंदाज असून त्याने मागील वर्षी आयर्लंड ए चे प्रतिनिधित्व केले आहे. अबु धाबीमध्ये झालेल्या त्या चार दिवसांच्या अफगाणिस्तान ए विरुद्धच्या सामन्यात तो खेळला होता.

“पॉल ऑस्ट्रेलियाच्या सामन्यानंतर स्कॅनिंग गेला. तेव्हा त्याची दुखापत गंभीर असल्याचे कळले. यामुळे त्याला उर्वरित सामन्यासाठी स्पर्धेतून बाहेर केले गेले. तो लवकरच घरी परतणार आहे. तेथे रिहॅबिलिटेशनमध्ये त्याच्या दुखापतीवर उपचार केले जातील”, असे आयर्लंड आयर्लंडचे हाय परफॉर्मन्स संचालक ग्रॅम वेस्ट यांनी सांगितले.

या स्पर्धेत आयर्लंडचे दोन सामने झाले आहेत. यामधील श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना २० धावांनी गमावला होता. आता त्यांचा पुढील सामना शनिवारी (१४ फेब्रुवारी) ओमान विरुद्ध आहे. हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. स्टर्लिंगच्या अनुपस्थितीत आयर्लंडच्या फलंदाजीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

झिम्बाब्वे संघाचा अनुभवी फलंदाज ब्रेंडन टेलरही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. बेन करनला त्याचा बदली खेळाडू म्हणून घोषित केले असून त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणही केलेले नाही, मात्र त्याने झिम्बाब्वेसाठी वनडे आणि कसोटी सामने खेळले आहेत.

तसेच बेनने झिम्बाब्वेच्या स्थानिक टी२० लीगमध्ये खेळताना ८ सामन्यात २०९ धावा केल्या होत्या. त्या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता. या स्पर्धेत अनेक खेळाडू दुखापतीतून सावरत परतत आहेत. आता त्यांची कामगिरी कशी असेल याकडे लक्ष असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---