---Advertisement---

हे पर्व सचिनचे नाही, तर विराटचे! वनडेत 46वे शतक ठोकण्यासाठी दोघांनी खेळले ‘एवढे’ डाव

On: रविवार, जानेवारी 15, 2023 7:21 PM
Virat-Kohli-And-Sachin-Tendulkar
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) तिरुवनंतपुरम येथे पार पाडला. या सामन्यात आधी अर्धशतक, नंतर शतक आणि पुढे दीडशतक झळकावत विराट कोहली याने विक्रमांचे मनोरे रचले. त्याच्या शतकी खेळीमुळे त्याने सचिन तेंडुलकर याचे अनेक विक्रम मोडीत काढले. त्यापैकी एका विक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया…

झाले असे की, भारतीय संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला आणि भल्या मोठ्या धावसंख्येचा डोंगर उभारला. भारताने यावेळी फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 390 धावा कुटल्या. या धावांमध्ये विराट कोहली (Virat Kohli) याचे सर्वाधिक योगदान होते. विराटने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 110 चेंडूंचा सामना करताना एकूण नाबाद 166 धावा केल्या. यामध्ये 8 षटकार आणि 13 चौकारांचा समावेश होता.

विराट कोहलीचा विक्रम
विराटने त्याचे शतक पूर्ण करण्यासाठी यावेळी 85 चेंडूंचा सामना केला. यानंतर विराटला वनडेतील 46वे शतक झळकावण्यासाठी फक्त 259 डावांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला त्याच्या वनडेतील 46व्या शतकासाठी तब्ब्ल 431 डावांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कमी डावांमध्ये सर्वाधिक जलद वनडे शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला.

वनडेत 46वे शतक झळकावण्यासाठी भारतीयांना खेळावे लागलेले डाव
259 डाव- विराट कोहली*
431 डाव- सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची वनडे कारकीर्द
सचिनच्या वनडे कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 463 सामन्यांतील 452 डावात फलंदाजी करताना 44.83च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान 49 शतके आणि 96 अर्धशतकेही झळकावली आहेत. यादरम्यान त्याची नाबाद 200 ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे.

विराट कोहलीची वनडे कारकीर्द
विराटच्या वनडे कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 268 सामन्यांतील 259 डावांमध्ये फलंदाजी करताना 58.24च्या सरासरीने 12754 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 46 शतके आणि 64 अर्धशतकेही ठोकली आहेत. यादरम्यान त्याची 183 ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. (Innings taken to Score 46 ODI 100s by indian players)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटची वादळी खेळी माहेला जयवर्धनेला पडली महागात, महान फलंदाजांच्या यादीतून झाला पत्ता कट
विराटची बॅट बोलते! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चा मोठा रेकॉर्ड, बनला टेबल टॉपर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---