दोनवर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रिकेटमधील रोमांच कायम राहावा म्हणून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेदरम्यान भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड असे संघ बलाढ्य संघ म्हणून पुढे आले. अखेरच्या मालिकेपर्यंत कोणाला अंतिम सामन्यात जागा मिळणार म्हणून चूरस पाहायला मिळाली. अखेर भारत आणि न्यूझीलंड संघांनी अंतिम सामन्याचे तिकिट मिळवले. अपेक्षेप्रमाणे अंतिम सामनाही रोमांचक झाला. या मानाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारत पहिला कसोटी विश्वविजेता होण्याचा मान पटकावला.
राखीव दिवशी लागला सामन्याचा निकाल
अंतिम सामन्यावर पहिल्या दिवसापासूनच पावसाचे सावट राहिले होते. या सामन्यातील पहिला आणि चौथा दिवस पूर्णपणे पावसामुळे वाया गेला. तसेच अन्य दिवशी अनेकदा कमी प्रकाशामुळे व्यत्यय आला. त्यामुळे हा उर्वरित सामना राखीव दिवशी म्हणजेच सामन्याच्या सहाव्या दिवशी खेळवावा लागला. या सामन्याच्या अखेरच्या आणि निर्णायक दिवशी न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत ८ विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने विजय मिळवताच त्यांच्या ड्रेसिंगरुममध्ये जोरदार जल्लोष करण्यात आला.
या अंतिम सामन्यातील अखेरच्या काही क्षणांचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर दुसऱ्या डावात १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सनने आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलरच्या नाबाद ९६ धावांच्या भागीदारीमुळे ४६ व्या षटकात सहज पूर्ण केला.
भावनिक करणारे अंतिम क्षण
या सामन्यात जेव्हा न्यूझीलंडला विजयासाठी केवळ ३ धावांची गरज होती, तेव्हा रॉस टेलरने ४६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर मोहम्मद शमीविरुद्ध चौकार ठोकला आणि न्यूझीलंडच्या गोटात जिंकल्याचा एकच जल्लोष झाला. खेळाडूंनी एकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. तर भारतीय गोटात मात्र, निराशेचे वातावरण दिसले. तरी सामना संपल्यानंतर लगेचच भारताचा कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांनी केन विलियम्सन आणि रॉस टेलरचे मैदानावर अभिनंदन केले. त्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर मात्र, मैदानावर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी विजेतेपदाचा चांगलाच जल्लोष केला. प्रत्येक खेळाडूने कसोटी विश्वविजेतेपदाची मानाची गदा हातात घेत जेतेपदाचा अनुभव घेतला. दरम्यान, केन विलियम्सनने ही मानाची गदा पहिल्यांदा उचलल्यानंतर ती न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंगकडे दिली. कारण हा सामना वॉटलिंगचा कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. त्याला
हा संपूर्ण भावनिक क्षणांचा व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला आयसीसीने कॅप्शन दिले आहे की ‘न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या रॉस टेलरपेक्षा विजयी धाव घेण्यासाठी दुसरे कोणी उत्तम नाही. विजयाची काही अंतिम क्षण आणि ट्रॉफी प्रेझेटेशन.’
Who better to hit the winning runs than the @BLACKCAPS’ greatest ever Test run-scorer, Ross Taylor?
Inside the winning moment and trophy presentation 🎥 #WTC21 pic.twitter.com/mvu5Ed5MaC
— ICC (@ICC) June 23, 2021
रॉस टेलर आणि केन विलियम्सन हे न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारे खेळाडू आहेत. टेलरने कसोटीत १०८ सामन्यांत ७५६४ धावा केल्या आहेत. तर विलियम्सनने ८५ सामन्यांत ७२३० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पणापासूनच भारताला नडणाऱ्या जेमिसनची ‘अशी’ राहिली कसोटी चॅम्पियनशीमधील कामगिरी
स्मिथची सावली मानल्या जाणाऱ्या लॅब्युशेनने गाजवली अख्खी ‘टेस्ट चॅम्पियनशिप’