अल्टीमेट टेबल टेनिस मध्ये टीम विकत घेऊन इंश्योरकोट स्पोर्ट्स प्रा. लि. (पुणेरी पलटण कबड्डी चे फ्रँचाईस होल्डर) ने क्रीडाविश्वात आणखी एक पाउल पुढले टाकले आहे.
पुणेरी पलटण जो संघ विवो प्रो कबड्डी लीग मध्ये खेळतो, ह्यांच्यावर पुणेकरांनी खूप प्रेम केले आणि भरभरून समर्थन केले. आता शहरातील क्रीडा प्रेमींना समर्थन करायला अजून एक नवीन टीम आहे – पुणेरी पलटण टेबल टेनिस च्या स्वरुपात.
टेबल टेनिस मध्ये टीम घेऊन, इंश्योरकोट स्पोर्ट्स ने त्यांचा क्रीडा जगातील पाया अजून मजबूत केला आहे. इंश्योरकोट स्पोर्ट्स चे नेहमीच स्पोर्ट्सला महत्त्व दिले आहे आणि अल्टीमेट टेबल टेनिस मध्ये टीम घेऊन त्यांनी त्यांचा स्पोर्ट्स बिजनेस वाढविला आहे.
कैलाश कांडपाल, सीईओ, इंश्योरकोट स्पोर्ट्स म्हणाले, “ टेबल टेनिस हा जलद गतीचा असा खेळ आहे ज्यात खूप एकाग्रता लागते. अल्टीमेट टेबल टेनिस मुळे भारतीय खेळाडूंचा खूप फायदा झाला आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांची प्रगती होत आहे. अल्टीमेट टेबल टेनिस मध्ये टीम घेऊन आम्ही त्यांच्या सोबत एकत्र काम करून भारताची आंतरराष्ट्रीय स्थरावर कामगिरी अजून उंचावण्याचा प्रयत्न करू. ”
पराग अग्रवाल, सहाय्यक संघप्रशिक्षक, पुणेरी पलटण टेबल टेनिस म्हणाले, “ आमची टीम संतुलीत आहे कारण आमच्या टीम मध्ये भारतीय तसेच विदेशी अनुभवी व तरुण खेळाडू ह्यांचे मिश्रण आहे. अल्टीमेट टेबल टेनिस मध्ये हे पुणेरी पलटण टेबल टेनिस टीमचे पहिले पर्व असणार आहे. आम्हाला फॅन्सला वर्ल्ड क्लास टेबल टेनिसचा अनुभव करून द्यायचा आहे. त्याचबरोबर देशासाठी सर्वोत्तम टेबल टेनिस खेळाडू घडविणे हे आमचे ध्येय आहे. “
अल्टीमेट टेबल टेनिसच्या तिसऱ्या पर्वासाठी पुणेरी पलटण टेबल टेनिसचे खेळाडू खालीलप्रमाणे आहेत:
- चुयांग ची-युआन
- हरमीत देसाई
- अयीखा मुखर्जी
- सेलेना सेल्वाकुमार
- रोनित भानजा
- सबिन विंटर