20 जुलैपासून अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये जुवेंट्स विरुद्ध रियल माद्रिद यांच्यात होणाऱ्या सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डो खेळणार नाही.
5 ऑगस्टला हा सामना असून रोनाल्डोचा यामध्ये समावेश नाही. तसेच जुवेंट्सने या स्पर्धेत झालेले दोन्ही सामने जिंकले असून रियलला अजून विजय मिळवता आला नाही.
रोनाल्डोच्या ट्रान्सफरला जवळ जवळ एक महिना झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आता एकमेंकाविरुद्ध खेळण्यास तयार आहेत.
रियलला अजुनही रोनाल्डोच्या जागी योग्य तो खेळाडू मिळाला नाही. गॅरेथ बॅले हा त्याची जागा घेण्यास तयार आहे. पण सध्या तो ही दुखापतीमुळे संघाच्या बाहेर असून आता सर्जियो रॅमोस आणि इस्कोवर संघाला विजय मिळवूण देण्याची मदार असणार आहे.
मिरालेम जॅनिच हा जुवेंट्सचा महत्त्वाचा खेळाडू असून तो मेजर लीग सॉकर विरूद्धच्या सामन्यात होता. हा सामना जुवेंट्सने पेनाल्टीत 5-3 असा जिंकला होता.
जुवेंट्सने बायर्न म्युनिच विरुद्ध 2-0 तर बेनेफिका विरुद्ध पेनाल्टीत 4-2 असा विजय मिळवला आहे. तर रोनाल्डोच्या संघात नसण्याने रियलला मॅंचेस्टर युनायटेड विरुद्ध 2-1 असा पराभव स्विकारावा लागला.
युनायटेड विरुद्धच्या सामन्यात प्रशिक्षक ज्युलेन लोपेतेंग्युईने राखीव खेळाडूंना खेळवले तर महत्त्वाच्या खेळाडूंना जुवेंट्स विरुद्धच्या सामन्यासाठी आराम दिला.
तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये हे संघ समोरा-समोर आले होते. त्यावेळी जुवेंट्सने रियलला 3-1ने पराभूत केले होते. हा एकमेव गोल रियलकडून रोनाल्डोने केला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–अॅंडरसनचे तब्बल ७८ चेंडू खेळलेल्या विराटने धावा केल्या केवळ १८
–या कारणामुळे कोहली-लाराशी पंगा घेणे गोलंदाजांना पडले महागात