---Advertisement---

दुनियेचं काय घेऊन बसलात, ‘हे’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही आहेत डिविलियर्सचे चाहते, पाहा ट्विट्स

---Advertisement---

मिस्टर ३६० अशी ओळख मिळवणाऱ्या एबी डिविलियर्सने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम नावावर केले आहेत. त्याच्या मैदानात चौफेर फटकेबाजीमुळेच त्याचे नाव मिस्टर ३६० असे पडले. त्याने फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षणात केलेली कामगिरी अनेकांसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे. अगदी विविध देशांचे क्रिकेटपटूही त्याच्या खेळाचे चाहते आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंसाठी तो आदर्श आहे आणि अनेकदा हे या क्रिकेटपटूंनी व्यक्तही केले आहे.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल, इंग्लंडचा जॉस बटलर, वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन अशा काही क्रिकेटपटूंनी तर डिविलियर्स हा त्यांचा आवडता खेळाडू असल्याचे सोशल मीडियावर देखील पोस्ट करत मान्य केले होते.

एबी डिविलियर्सने जेव्हा २३ मे २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, तेव्हा केएल राहुलने ट्विट करत तो त्याचा आवडता खेळाडू असल्याचे सांगितले होते. केएल राहुलने ट्विट केले होते की ‘क्रिकेट हा एकदम साधा खेळ आहे केेएल, तू जितका त्याला साधेपणाने खेळशील तितके जास्त हा खेळ तूला देत राहिल,’ हा सल्ला मी २१ वर्षांचा असताना एबी डिविलियर्स या दिग्गज व्यक्तीने दिला होता. तू नेहमीच माझा आवडता क्रिकेटपटू राहशील.’

डिविलियर्स आणि राहुल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून काहीवर्षे आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत.

याबरोबरत जॉस बटलरने तब्बल ९ वर्षांपूर्वी १७ एप्रिल २०१२ ला ट्विट केले होते की एबी डिविलियर्स त्याचा आवडता खेळाडू आहे. तसेच निकोलस पूरनने २२ सप्टेंबर २०१३ ला डिविलियर्सचे नाव त्याचा आवडता खेळाडू म्हणून घेतले होते.

या व्यतिरिक्त बाबर आझम, भुवनेश्वर कुमार, सॅम बिलिंग्स, ग्लेन मॅक्सवेल अशा अनेक क्रिकेटपटूंनी डिविलियर्स आवडता खेळाडू असल्याचे मान्य केले होते.

एबी डिविलियर्सची कारकिर्द – 

एबी डीविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११४ कसोटीत ५०.६६च्या सरासरीने ८७६५ धावा, वनडेत २२८ सामन्यात ५३.५च्या सरासरीने ९५७७ धावा तर टी२०मध्ये ७८ सामन्यात २६.१२च्या सरासरीने १६७२ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने कसोटीत २ आणि वनडेत ७ विकेट्सही घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने यष्टीरक्षण करताना २१९ बळी घेतले आहेत.

डिविलियर्सने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो विविध देशांच्या लीग स्पर्धांमध्ये सक्रिय आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कराडजवळ भीषण कार अपघात; पुण्यातील तीन पैलवानांना गमवावा लागला जीव

हा कसला प्रकार! क्रिकेटपटूंनी चालू सामन्यात मैदानावरच काढले कपडे, पाहा मजेशीर व्हिडिओ

…अन् ‘या’ पठ्ठ्याने अवघ्या २५व्या वर्षी झळकाविले त्रिशतक!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---