पुणे । एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिगच्या (मॅनेट) खेळाडूंनी सर्वाधिक १८ सुवर्ण, १८ रौप्य पदक जिंकत प्रथम क्रमांक पटकावले. तसेच एमआयटी स्कूल ऑफ डिझाईन यांनी १५ सुवर्ण आणि १५ रौप्य पदक जिंकत दुसरे, तर एमआयटी स्कूल इंजीनिअरिंगच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण आणि ६ रौप्य पदक जिंकत तिसरे क्रमांक पटकावले.
आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा २०१९ च्या सर्वसाधारण विजेत्यांसह सर्व १३ खेळ प्रकारातील वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारातील विजेत्यांना सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुणे मिस्टर इंडिया आंतरराष्ट्रीय पदक विजेता धारासिंग खुराना, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी एमआयटी मॅनेटचे प्राचार्य डॉ. सुबोध देवगावकर, एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्टस् चे प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे, डॉ. कृष्णमुर्ती ठाकुर, एमआयटी क्रिडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड आदी उपस्थित होते.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी १३ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), बुद्धीबळ (पुरुष व महिला), व्हॉलिबॉल (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष व महिला), क्रास कंट्री (पुरुष व महिला), टेबल टेनिस (पुरुष), टेनिस (पुरुष) स्विमिंग (पुरुष व महिला), रोईंग (पुरुष व महिला), अॅथलेटिक्स (पुरुष व महिला), कब्बडी (पुरुष), बास्केटबॉल या खेळांचा समावेश होता, तर यात विविध संस्थातील ७७२ हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
एमआयटी स्कूल ऑफ अर्किटेक्चरने २ सुवर्ण आणि २ रौप्य पदक, एमआयटी मिटकॉमच्या संघाने १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक, एमआयटी एसबीएसआर संघाने १ सुवर्ण आणि १ रौप्य पदक, तर एमआयटी कॉलेज ऑफ अन्न तंत्रज्ञान संघाने ३ रौप्य पदक जिंकले.
एमआयटी स्कूल ऑफ डिझाईन आणि एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग यांच्या झालेल्या बॅटमिंटनच्या अंतिम सामन्यात एमआयटी आयडी संघाने विजय संपादन करत सुवर्ण पदक जिंकले, तर महिलांच्या बॅटमिंटनच्या अंतिम सामन्यात एमआयटी स्कूल ऑफ डिझाईन संघाने एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनिअरिंग सायन्सेस आणि रिसर्च संघाचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.
टेबल टेनिस स्पर्धेत एमआयटी एसओई संघाने एमआयटी मॅनेट संघाला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले. क्रास कंट्री पुरुष व महिला संघात मॅनेट सुवर्ण तर एमआयटी एसओईने रौप्य पदक जिंकले. बुद्धीबळ पुरुष स्पर्धेत एमआयटी एसओईने सुवर्ण, तर एमआयटी मॅनेट संघाने रौप्य पदक जिंकले. बुद्धीबळ महिला स्पर्धेत एसबीएसआर संघाने सुवर्ण पदक जिंकले.
क्रिकेट स्पर्धेत एमआयटी मॅनेट संघाने एमआयटी एसओई संघाला पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. टेनिस पुरुष स्पर्धेत एमआयटी एसओई संघाने एमआयटी मॅनेट संघाला पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. व्हॉलीबॉल पुरुष संघात एमआयटी मिटकॉम संघाने सुवर्ण पदक जिंकले, तर एमआयटी मॅनेट संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बास्केटबॉल पुरुष स्पर्धेत एमआयटी मॅनेट संघाने सुवर्ण पदक जिंकले. फुटबॉल स्पर्धेत एमआयटी एसओई, कब्बडी स्पर्धेत एमआयटी मॅनेट संघाने सुवर्ण पदक जिंकला. रोईंग आणि जलतरण स्पर्धेत मॅनेटच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले.