मुंबई | प्रो-कबड्डी लिलावात १ कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळालेला महाराष्ट्राचा पहिला आणि एकमेव खेळाडू बनण्याचा मान महाराष्ट्राच्या रिशांक देवडिगाला मिळाला. त्याला तब्बल १ कोटी ११ लाख रुपये मोजत युपी योद्धाजने आपल्या संघात घेतले.
याबद्द्ल महा स्पोर्ट्सशी बोलताना रिशांकने आनंद व्यक्त केला. “मला जेव्हा समजले की फजलला सकाळच्या सत्रात १ कोटीपेक्षा जास्त बोली लागली तेव्हा मला अंदाज आला होता की मलाही १ कोटी रुपये या लिलावात मिळु शकतात. माझी आई माझ्यासाठी प्रार्थना करत होती. तिची प्रार्थना कामाला आली.” असे ६५व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद मिळवुन देणारा कर्णधार रिशांक म्हणाला.
रिशांक सध्या राष्ट्रीय सराव शिबीरात असुन तो एशियन गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे. “मी सध्या सराव शिबीरात कठोर मेहनत घेत आहे. यावर्षी मी कामगिरीही चांगली केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळेल अशी खात्री आहे. एशियन गेम्सनंतर पुर्णपणे फीट रहात प्रो-कबड्डीचा संपुर्ण हंगाम खेळण्याला माझे प्राधान्य असेल. “असेही तो पुढे म्हणाला.
एवढ्या मोठ्या रकमेचे काय करणार असे विचारले असता तो म्हणाला, “मी अजुनतरी याबद्दल जास्त काही विचार केला नाही. परंतु माझं एका चांगल्या घराचं स्वप्न आहे तसेच बहिणीच्या लग्नासाठीही यातुन मी खर्च करणार आहे. ”
रिशांकचा मोठी चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे. तब्बल 11 वर्षांना महाराष्ट्राला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवुन देण्यात कर्णधार म्हणुन त्याने मोलाची भुमिका पार पाडली होती. अनेक सामन्यात अखेरच्या क्षणी चांगली कामगिरी करत त्याने विजयश्री खेचून आणली होती.
रिशांकने या स्पर्धेत पहिले चार हंगाम मुंबईकडून खेळला आहे तर गेल्या हंगामात तो युपीकडूनच खेळला होता. ८० सामन्यात त्याने रेडिंगमध्ये ४४९ गुण घेतले आहेत.
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती
-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू
–आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली








